मित्रांनो, जास्वंदच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची, त्याचबरोबर झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणकोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. तर जास्वंदीच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आज आपण जे खत तयार करणार आहोत त्यासाठी दोन वस्तूंचा वापर करणार आहे.
त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असणारी ही ताजी चहा पावडर आहे. चहा पावडर मध्ये हे नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे झाडांची वाढ चांगली होऊन झाडांना भरपूर फुले लागण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर चहा पावडर ही कुंडीतील माती असिडिक बनवण्याचे देखील काम करत असते आणि झाडांना अशा भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी असिडिक मातीचीच अवश्यकता असते.
बऱ्याच वेळा जास्वंदीच्या झाडावरती अशा भरपूर अशा कळ्या लागतात. मात्र त्या उमलण्या आधीच पिवळ्या होऊन गळायला सुरुवात होत असते.तर त्याचे कारण म्हणजे एक तर झाडांना पोषक तत्वांची म्हणजेच खतांची कमतरता असणे. जास्वंदीच झाड हे गुलाबाच्या झाडाप्रमाणेच हेवी फीडर प्लांट आहे. हे वर्षभर फुले देत राहते त्यामुळे ह्याला वेळोवेळी अदलून बदलून वेगवेगळी खते ही द्यावीच लागतात, तरच झाडावरती असे भरपूर कळ्या आणि फुले ही लागत राहतात.दुसरे मुख्य कारण म्हणजे झाडाला पाणी हे कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये देणे.
झाडाला पाणी कमी मिळाल्यामुळे जसे झाड सुकते तसेच जास्त पाणी झाडाला मिळाल्यामुळे देखील झाडावरचे पाने पिवळी होऊन गळणे, झाडावरती ज्या लागलेल्या कळ्या आहेत त्या देखील उमलण्या आधीच गळायला सुरुवात होत असते. जास्वंदीच्या झाडाला खत तयार करून देण्यासाठी ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे मेथीदाणे आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये हे मेथीदाणे हे असतातच. मेथीदाणे हे आपल्या शरीरासाठी जसे फायदेशीर आहेत तसेच ते झाडांसाठी देखील अत्यंत फायदेशीर उपयुक्त असे आहेत.
कारण याच्यामध्ये अशी खूप सारे पोषक तत्व म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे याच्या वापरामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडांना भरपूर अशा कळ्या आणि फुले लागण्यासाठी देखील मदत होत असते.आता या मेथी दाण्याचा वापर आपण दोन प्रकारे करू शकतो. एक तर याची पावडर तयार करून ते पाण्यामध्ये भिजत ठेवून किंवा अक्खे जे मेथीदाणे आहेत ते देखील तसेच पाण्यामध्ये भिजत ठेवून देखील त्यापासून खत तयार करता येते. या मेथी दाण्याची मिक्सर मधून पावडर तयार करून घेतलेली आहे. आता या पावडरचा वापर देखील आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे.
म्हणजे एक लिटर पाण्यासाठी फक्त अर्धा चमचा एवढीच ही पावडर वापरायची आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा ही जी आपण ताजी चहा पावडर घेतलेली आहे, ह्या दोन्ही वस्तू आपल्याला पाण्यामध्ये दोन दिवसासाठी भिजत ठेवायच्या आहेत, जेणेकरून यांच्यामध्ये सर्व जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल.पाण्यामध्ये ही चहा पावडर मेथी दाणे भिजत ठेवल्यानंतर हे एखाद्या सावलीच्या ठिकाणी हे झाकून ठेवायचे, उन्हामध्ये ठेवायचे नाही. दोन दिवसानंतर आपले हे खत तयार होईल.
दोन दिवसानंतर तुम्हाला ह्या पाण्याचा रंग हा बदललेला दिसून येईल म्हणजेच आपले हे खत हे तयार झालेले आहे. आता हे जे तयार झालेले खत आहे याचा वापर देखील झाडांना असाच न करता हे पाण्यामध्ये डायलुट करून नंतरच त्याचा वापर झाडांना करायचा आहे.म्हणजे हे एक मग जर खत असेल तर त्याच्यामध्ये अजून दोन मग साधे पाणी मिक्स करून नंतरच आपण हे झाडांना देणार आहोत.
आता खत देताना देखील झाडांना कुंडीच्या आकारानुसार म्हणजे जर कुंडी 8 ते 10 इंचाची असेल तर एक मग आणि त्यापेक्षा जर मोठे झाड असेल तर दोन मग या प्रमाणामध्ये हे खत महिन्यातून एकदा जर तुम्ही जास्वंदीच्या झाडाला दिले तर हे झाड कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल.
अशापकारे आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्ही खते तयार करून जास्वंदीच्या झाडाला दिली तर या झाडाची वाढ चांगली होऊन झाडाला भरपूर अशी फुले लागतील.
तर कसा वाटला आजचा हा लेख हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा लेख तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.