मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे येतच असतात आणि प्रत्येक जण त्यांना सामोरे जातच असतो. या येणारा परिस्थिती मधून माणूस खूप काही शिकायला लागतो. परंतु त्या परिस्थितीमध्ये असताना त्याला अनेक खडतर प्रवासातला सामोरे जावे लागते आणि या खडतर प्रवासांना सामोरे जाण्यासाठी एक ध्येयाची बाजू आपल्या सोबत असणे खूप गरजेचे असते. ती बाजू आपल्याला सुंदर सुविचार मधून मिळत असते. म्हणूनच आज आपण असेच काही सुंदर सुविचार जाणून घेणार आहोत.
ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही आणि खरंच जर कधी सापडला तर तो अश्रूच येवू देत नाही.
“स्वतःला मोठे व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात. त्यांची प्रगती कायम होत राहते”
रागावलेली व्यक्ती रागाच्या भरात काहीही बोलू शकते पण आपलं कधीच वाईट नाही करू शकत ! कारण त्या व्यक्तीच्या रागात काळजी आणि मनात प्रेम असतं
कुणासाठी कितीही केलं तरी आपला उपयोग फक्त त्यांची गरज संपेपर्यंतच असतो.
भावना तिथेच व्यक्त करा जिथे त्यांचा आदर केला जाईल! नाहीतर डोळ्यातून वाहणारे अश्रू सुद्धा काही लोकांना फक्त पाणी वाटतं.
डोळे तर सगळ्यांनाच आहेत पण फार कमी माणसांनाच माणसं दिसतात बाकीच्यांना फक्त पैसा आणि स्वतःचा मतलब दिसतो.
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं.
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलोपावली येथील कठीण संकटं पण ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.
“आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जी वाट बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे प्रयत्न करतात आणि सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात”
कुणाच्या नशिबाला हसू नका नशिब कुणी विकत घेत नसतं! वेळेचं नेहमी भान ठेवा! वाईट वेळ सांगून येत नसते, बुद्धी कितीही तल्लख असली तरी नशिबाशिवाय जिंकता येत नसते.
आयुष्यातील सुंदर क्षण हे अगदी क्षणिक, जसं आळवावरती असलेलं पाणीच म्हणून जमतील तितके गोळा करून रिकाम्या मानाची ओंजळ भरावी.
समाधान ही अंतकरणाची जगातील सर्वात सुंदर संपत्ती आहे, ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगातील सगळ्यात सुखी माणूस असतो.
परिस्थितीची जाणीव असेल तरच जीवनाची वाटचाल यशाकडे चालू होते.
जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते कधी कधी धीर देणारे हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते.
जीवनामध्ये कर्म करत असताना बुद्धीला विचारांचे अंकुश असले तर देहाकडून घडणारी कर्म उत्तमच असतात.
चेहऱ्यावरच्या हसण्यात खूप ताकद असते आलेल्या दुःखाला ते माघारी पाठवते.
वाईट परिस्थिती कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरत असते.
सोडून द्यायला शिका, हा असंच वागला, तो तसाच वागला, हा असा बोलला, यानं विश्वासघात केला, त्यानं घोका दिला ! त्यापेक्षा कोण कसा वागला या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा, आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा! त्यांच्या चुका तिथंच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा !
माणुसकी प्राण्याला दाखवली कि ती लळा लावतात आणि माणसांना दाखवली कि ती गळा कापतात.
आयुष्यात कोणासोबत कितीही चांगलं वागा आपण नेहमीच कुठेतरी कमी पडतो कारण लोकांना फक्त आपल्या चुका दिसतात आपण लावलेला जीव नाही
जी माणसं मनाने भोळी आणि स्वभावाने साधी असतात त्यांना इतरांपेक्षा जास्त दुःख आणि त्रास आयुष्यात सहन करावा लागत असतो हे वास्तविक सत्य आहे.
समजून घेणारं मन प्रत्येकवेळी समजून घेऊन इतकं थकतं की मग नंतर कोणी कसंही वागलं तरी त्याला काहीच फरक पडत नाही.
पहिले लोक समजूतदार होते नाते निभवायचे, मग लोक प्रॅक्टिकल झाले नात्यातून फायदा घ्यायला लागले आता लोक प्रोफेशनल झालेत, फायदा असेल तरच नातं ठेवतात !
खोटे बोलणाऱ्याचा आवाज मोठा असतो कारण खोटे सिद्ध करावं लागतं, खरं बोलणारा सामान्य आवाजात बोलत असतो! कारण त्याला जे आहे तेच बोलायचं असतं! खोट्या पुराव्यावर खोटं न्यायालयात सिद्ध होऊ शकतं, पण नियतीच्या न्यायालयात फक्त सत्यच टिकतं !
सोनं ठेवायला लॉकर हे सहज मिळून जातं पैसं ठेवायला बँक पण मिळून जाते पण मनातील गोष्टी सांगायला योग्य मित्र मिळायला खूप भाग्य लागतं.
संसार म्हटल्यावर भांड्याला भांडं हे लागणारच ! फक्त त्या भांड्यामधून उमटलेला ध्वनी हा घरा पुरताच मर्यादित असावा! कारण तो घराबाहेर गेला की भांड्यासोबत संसारही रस्त्यावर आला म्हणून समजा!
अशाप्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत.