पांढऱ्या कपड्यावर पडलेले कसलेही जुनाट डाग, घालवा घरच्या घरी पाच मिनिटांत? पांढरे कपडे होतील एकदम नव्यासारखे वापरा या ट्रिक्स…..!!

Uncategorized

मित्रांनो, पांढरी साडी, कुर्ता, पंजाबी ड्रेस किंवा पुरुष पांढरा शर्ट, पांढरा कुर्ता आणि सलवार असे कपडे घालतात. पण यावेळी माती, गुलाल किंवा आणखी काही लागून कपडे खराब होतात. हेच कपडे घालून आपण चहा प्यायला किंवा खायला गेलो तर त्याचेही डाग कपड्यावर पडतात आणि मग पांढरे कपडे खराब होतात. असे कपडे थेट वॉशिंग मशीनला लावले तरी त्याचे डाग निघत नाहीत.

 

अशावेळी हे पांढरे कपडे हातानेच घासावे लागतात, अनेकदा हे डाग इतके हट्टी असतात की ते हाताने, साध्या साबणाने घासूनही निघत नाहीत. अशावेळी पांढरे कपडे स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक वापरल्यास हे कपडे स्वच्छ होण्यास मदत होते. या ट्रिक कोणत्या आणि त्या कशा वापरायच्या याची माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

पांढरेशुभ्र कपडे अंगावर असले की त्यांचा रुबाब काही वेगळाच दिसतो. कोणतीही व्यक्ती मग ती सावळी असो किंवा उजळ असो पांढऱ्या कपड्यांमध्ये उठूनच दिसते, देखणी वाटते. पण पांढरे कपडे मेंटेन करणं, त्यांचा शुभ्र पांढरा रंग टिकवून ठेवणे हे खरोखरच अवघड काम आहे. कारण कितीही स्वच्छ धुतले तरी काही दिवसांतच ते पिवळट- काळपट दिसू लागतात. म्हणूनच पांढऱ्या कपड्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी हे काही उपाय जाणून घेऊया.

 

1. लिंबू. यासाठी एक बादलीमध्ये गरम पाणी घ्या, त्या पाण्यात एक लिंबू पिळा. साधारण एका कपड्यासाठी अर्धी बादली पाणी आणि एक लिंबू याप्रमाणे वापरा. त्या पाण्यात पांढरे कपडे अर्धा तास भिजत ठेवा आणि नंतर नेहमीप्रमाणे धुवून टाका.

 

2. व्हिनेगर. कपड्यांचा पिवळटपणा काढून टाकण्यासाठी लिंबाप्रमाणेच व्हिनेगरही उपयुक्त ठरते. यासाठी कपडे भिजवताना किंवा मशीनमध्ये लावताना डिटर्जंटसोबत २ ते ३ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर टाकावे. आणि कपडे नेहमीप्रमाणे धुवून टाकावेत. यामुळे कपड्यांचा बदललेला रंग पुन्हा पुर्ववत होण्यास मदत होते.

 

3. बेकिंग सोडा. अर्धी बादली पाण्यात एक कप बेकिंग सोडा टाका. त्यात पांढरे कपडे अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवा.त्यानंतर नेहमीप्रमाणे कपडे साबण किंवा डिटर्जंट लावून धुवून टाका. कपड्यांचा पिवळट- काळपटपणा कमी झालेला असेल. कपड्यांचा काळपट- पिवळटपणा काढून टाकायचा असेल, तर स्वच्छ धुतलेले कपडे नेहमी उन्हात, मोकळ्या हवेत वाळू घाला.

 

4.बाजारात विविध कंपन्यांचे ब्लीच उपलब्ध असतात. या ब्लीचने पांढऱ्या कपड्यांवरचे डाग सहज निघण्यास मदत होते. कोमट पाण्यात साधारण २ चमचे ब्लीच घालून पांढरे कपडे त्यात तासभर भिजवायचे. नंतर थोडा साबण लावून ब्रशने कपडे घासल्यास कपड्यांवरचे डाग निघून जाण्यास मदत होते.

 

अशा प्रकारे पांढरे कपडे नव्यासारखी करण्यासाठीं या उपायांचा वापर करु शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.