त्रास देणाऱ्या, आणि अपमान करणाऱ्या लोकांना कसं हँडल करायचं? एकदा नक्की वाचा ..!!

Uncategorized

मित्रांनो आपल्या आजूबाजूला असे बरेचं त्रासदायक लोकं असतात. जे आपले जवळचे असतात. पण त्रासदायक असतात, negetive असतात, आणि ते नेहमी आपल्या मनाचं खच्चीकरणं करण्याचा प्रयत्न करतं असतात. तर, ही जी त्रासदायक माणसं असतात त्यांना handle करणं सध्या सरळं माणसाला थोडं कठीणचं जातं.आणि आपल्याला बऱ्याचदा इच्छा नसतानाही त्यांच्या मनाप्रमाणे वागवं लागतं, त्यांचा त्रास सहन करावा लागतो. अश्या लोकांच्या वागण्याची पद्धतं थोडी लक्षातं घेतली तरं, आपला त्रास कमी होऊ शकतो.

 

मग अश्या लोकांबरोबरं आपणं कसं वागू शकतो. अश्या लोकांबरोबरं कश्याप्रकारे deal करायची. कशाप्रकारे आपण त्या लोकांचा आपल्याला होणारा त्रास कमी करू शकतो त्या लोकांपासून आपण कशाप्रकारे दूर जाऊ शकतो. त्या लोकांना आपण हँडल कसं करू शकतो. याबद्दलचे संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

सर्वप्रथम यांना टाळू नका. कारणं यांना टाळून-टाळून किती टाळणारं आतापर्यंत आपण टाळू शकलोय? नाही मग पुढे ही नाही टाळू शकणार. आणि याच्या समोर आपल्याला कधी ना कधी जावचं लागतं. म्हणून यांना टाळण्यापेक्षा यांना face करायला शिकलं पाहिजे. त्यांच्या सामोरे जायला शिकलं पाहिजे.जेव्हाही ती व्यक्ति तुमच्या समोर येईल ना जीच्यामुळे तुम्हाला त्रास होतोयं जी तुम्हाला irritate करतेय.

 

ती जशी तुमच्यासमोर आली, ती तुम्हाला काहीतरी बोलणारं आहे. ती बोलायच्या आधीचं तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा.100% याच्या बोलण्याचा मला त्रास होणार आहे. 100% हा असं काहीतरी बोलणारं आहे ज्यामुळे मला ताण येईल. त्यानंतर तो व्यक्ति तुमच्याशी बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्यावेळापूर्वी समजावलं होतं ना ते आठवायचं की हा व्यक्ति आहेचं असा.

 

मला वाटलचं होतं की हा असचं काहीतरी बोलेलं याचा हे तुचं मुळात मला त्रास व्हावा असा आहे.असं बोलून स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करा आणि तो व्यक्ति तुम्हाला जे काही बोलला असेल ते विसारण्याचा प्रयत्न करा.आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो स्वतः काहीही सांगू दे काहीही विचारू दे, आपण मात्र त्याच्याशी one word communication ठेवायचं.जसं की, बरोबर आहे. अच्छा, असं झालं का. नाही-नाही असं काही नाही आहे. बरं-बरं ठीक आहे. अश्याप्रकारे अश्या व्यक्तींशी बोलायचं.आपण जितकं त्यांना response देतो ना तितकं ते त्यांच बोलणं जास्त वाढवतात.

 

किंवा ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून blame करतं असतीलं आणि आपण जितकं नाही म्हणतो ना तितकं ते आपल्याला जास्त blame करतं जातात.त्यापेक्षा ते जे सांगताय ते हो म्हणून मोकळं व्हायचं. जेणेकरून ते लवकरं तेथून निघून जातात.आणि त्यांना असंही कळतं की अरे, माझ्या बोलण्याचा तर समोरच्याला काही फरकं च पडतं नाही आहे. आणि म्हणून ते तुम्हाला काही बोलणचं सोडून देतात.तुमची insert करणं बंद करून टाकतात.

 

कारण अश्या लोकांना हेचं हवं असतं की, तुम्हाला फरकं पडला पाहिजे .अजून एक गोष्ट म्हणजे तो जे काही सांगतोय तिथे curiosity दाखवायची नाही. आपण समोरच्याच बोलणं ऐकण्यात जास्त interest नाही दाखवला तर आपोआपचं तो व्यक्ति शांत होऊन जातो.आणि अश्या व्यक्तिशी स्वतःहून स्वतःची कोणतीही गोष्ट share करू नका.आज आपल्या तो खूप जवळचा आहे असं दाखवून तो ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करेल.

 

आपल्या ज्या personal गोष्टी असतात ना त्या अश्या लोकांना नाही सांगायच्या. अश्या लोकांवर कधीचं विश्वास नाही ठेवायचा जे वेळोवेळी आपली insert करतं असतील. आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतं असतील.आणि अश्या लोकांसमोर आपल्या जवळच्या मानसाबद्दल तर चुकूनही काही सांगू नका कारण आपलीच माणसं आपल्याच विरोधात करायला त्यांना खूप छान जमतं.एखाद्या व्यक्तिशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काहीही बोलू नका.

 

अजून एक गोष्ट अश्या लोकांशी कधीही नजर चुकवून बोलू नका. मग, भलेही तुम्ही तुमच्या घरातं असाल, बाहेर असालं, कुठेही असालं. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला. त्यांच्याकडे बघून बोला.आपण त्यांच्याकडे बघितलं नाही तर बऱ्याचदा त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतोय. ही त्यांना कुठे माहिती असतं की, खरतरं आपल्याला त्यांच्याकडे बघायची इच्छाचं नसते म्हणून आपण त्यांच्याकडे बघतं नसतो.

 

हे त्यांना माहिती नसतं.अजून काही माणसं कशी असतात माहितीय का, ती आपल्याला काही बोलल्यानंतर joke ऐकल्यासारखं दाखवतात.आणि आपल्याला कितीही tension असलं ना तरी अश्या toxic लोकांसमोर आपण खुश आहोत. सगळं काही ठीक आहे. असचं दाखवायचं.कारण आपण दुःखी आहोत त्यांना सांगितलं, समजलं तर त्यांना दुःख होणार नाही. त्यांना खूप जास्त आनंद होईल.

 

ज्याप्रकारे या लोकांशी आपलं दुःख share करायचं नाही त्याचप्रमाने या लोकांशी आपला आनंद सुद्धा share करायचा नाही.आपण जरं एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय तर तेही ती गोष्ट मिळवण्याआधी त्यांना सांगायचं नाही.कारण ते आपल्यावर हसणारचं आहेत की, अरे, तू असं असं करतोय. तुझ्याने नाही होणार. ते आपल्याला demotivate करण्याचा प्रयत्न करायला लागतात.आणि अश्या लोकांमुळे आपण खरचं demotivate होऊन जातो.

 

आणि आपल्याला कळतं ना असे काही लोकं असतात; जे आपल्या सोबत आपल्या समोरचं गोडं बोलतात. तोंडावर गोडं बोलतात.आणि मागून मात्र ते आपला तिरस्कार करतं असतात. म्हणून जर तुम्ही त्यांना तुमची एखादी आनंदाची गोष्ट सांगितली तर ते तुमच्या तोंडावर तुमच अभिनंदन करतील. आणि कसं या आनंदाला विरजणं लावायचं याची तयारी करायला सुरुवात करतील.

 

या माणसांच कसं असतं माहितीय का? ही माणसं image conscios असतात. बदनाम व्हायला घाबरतात. आणि स्वतःची खोटी image घेऊन फिरतात.ते स्वतः सतत स्वतःला fake दाखवतं असतात. त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या असण्यात खूप फरकं असतो. ते जसे बोलतात समोरच्याला जसं दाखवतात तसे ते अजिबात नसतात.आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अश्या लोकांकडून कधीही आर्थिक मदत घेऊ नये.

 

अश्या लोकांकडून कधीच आपण उसने पैसे किंवा काहीही मदत नाही मागितली पाहिजे.कारण अशी काही लोकं असतात ती ठरवून येतात. एक target घेऊन any how आपल्याला मनातून अस्थिर करायचं आहे हाचं त्यांचा उद्देश असतो.ही माणसं समोर असल्यावर ना डोक्याचं आणि मनाचं दार लावून एक dustbin open करून ठेवायची.जेणेकरून ते जे काही निरर्थक बोलतील ते डोक्यात मनात न जाता dustbin मधे जाईल.

 

आणि जर तुम्हाला खुश राहायचंय ना तर अश्या लोकांसपासून तुम्हाला जितकं दूर राहता येईल तितकं दूर रहा. यांना ignore करायला शिका. यांच्या कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला फरकं पडू देऊ नका. तुम्हाला त्रास देणाऱ्यांकडे सरळ बघा आणि त्यांच्या वर्तनाला स्पष्टपणे व शांतपणे उत्तर द्या. तुम्हाला तुमच्या हक्कांची व खासगीत्वाच्या अधिकाराची जाणीव आहे हे समोरच्याला दाखवून द्या.

 

अशा प्रकारे आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपण हॅण्डल करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.