मित्रांनो, आपल्या अवतीभवती असे काही लोक असतात की जे आपल्याशी स्वार्थापोटी नाते जोडत असतात व त्यांचा स्वार्थ सिद्ध झाला की ते आपल्याशी असलेले नाते तोडतात. पण अशा स्वार्थासाठी नाते जोडणाऱ्या लोकांना कधीही जीवनामध्ये सुख मिळत नाही. ते आपल्याला ही लोक स्वार्थासाठी त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. असे लोक जीवनात कधीही सुखी होत नाही. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण असे सुंदर सुविचार जाणून घेणार आहोत.
स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करणाऱ्यांना आणि स्वतःच्या मतलबासाठी इतरांना त्रास देणाऱ्यांना आयुष्यात कधीचं सुख लाभत नसतं ते कायम दुःखीच असतात..!
गैरसमज हे सत्य ऐकू देतं नाही आणि अहंकार हा सत्य पाहू देतं नाही..!
बायकोला नवऱ्याची साथ असेल, तर ती झोपडीत सुद्धा संसार करू शकत असते, पण जर नवऱ्याची साथ प्रेम आणि आदर नसेल, तर तिच्या समोर तुमचा ताजमहल पण फिका असतो..!
एक दिवस परिस्थितीनं दरिद्री असलेल्या माणसाची परिस्थिती नक्कीच सुधारून जाईल पण विचारानं दरिद्री असलेल्या माणसाची कधीही सुधारतं नसते..!
आई भलेही शिकलेली नसेल पण जगायचं कसं हे आईचं शिकवतं असते..!
दोनाचे चार हात झाले, की सगळ्या चिंता मिटल्या हा एक समज आहे पण आयुष्याचं खरं सूर तर इथूनच झिरपू लागतं असतात, रोजच्या जगण्यातली मोठी-मोठी स्थित्यंतरं भावनिक-मानसिक आंदोलनं आणि सुखाची आवर्तनं हे सगळं गुंफून राहतं केवळ लग्न या शब्दाभोवती..!
ज्या व्यक्तीला फक्त पाहिल्यावरच आपलं मन प्रसन्नतेनं भरून येतं त्या व्यक्तीशी आपलं मागच्या जन्माचं काहीतरी ऋणानुबंध असतात..!
नाते मोठी नसतात, तर ते सांभाळणारी माणसं मोठी असतात..!
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षीस हमखास मिळतं असतात, एक म्हणजे विरोध आणि दुसरं म्हणजे टीका..!
आयुष्य फुकट मिळतं असतं असं लोक म्हणतात, पण त्यासाठी नऊ महिन्यांची काळजी जपणूक आणि प्रत्येक श्वासात वेदनेच्या कळा आपल्या आईनं आपल्यासाठी मोजलेल्या असतात..!
माणसाची निती ही चांगली असेल तर मनामध्ये कधीचं भीती उरत नसते..!
जगण्याचा दर्जा हा आपल्या विचारावर अवलंबून असतो परिस्थितीवर नाही..!
भांडण पण कधीकधी चांगलं वळणं घेतं असतं आपल्याला कळतं की समोरच्या मनात आपल्याबद्दल काय सलत आहे..!
दुसऱ्या बद्दल वाईट बोलण्यानं आपला चांगुलपणा कधीचं सिद्ध होतं नसतो..!
जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळतं नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटतं नसतात, म्हणून प्रत्येकाशी प्रेमानं वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधानं नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधरण ठीक होतं असते, म्हणून शब्दाला घार नको आधार हवा..!
खोटं कधीचं लपत नाही आणि लपवण्याचा प्रयत्न केला खोट्याला तर ते खोटं ज्या दिवशी बाहेर येतं त्या दिवशी आपल्या नात्याला आणि आपल्या माणसानं आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला तोडूनच बाहेर येतं म्हणून खोटं बोलताना विचार करून बोला खरं बोलून वाद झालं तरी चालतील पण खोटं बोलून समोरच्याचा नजरेत कधीचं पडू नका..!
तुमचा संसार थाटायला जी बापाला सोडून आलेली असते त्या बापाची ती एकुलती एक असते लाडाची मुलगी असते ती तिच्या बापाचा मान असते सन्मान असते अभिमान असते आणि तिला आपण सहज बोलून जातो तुझ्या बापानं आम्हाला दिलंय काय..!
तुमच्या मोबाईलचा खर्च बाप करतं असतो, बॅलेन्स चा खर्च बाप करतं असतो, तुमच्या मौजमजेचा खर्च बाप करतं असतो तुमच्या लग्नाचा खर्च बाप करतं असतो पण जेंव्हा बापावर खर्च करायची वेळ येतं असते, तेव्हा पोरग म्हणतं आम्ही दोघं वेगळे राहतो..!
सध्याच्या युगामध्ये पैसे खर्च करून घर बांधता येईल पण घरातील माणसांचं मन जपून एकत्र राहणं काही समजूतदार लोकांच्या नशिबात असणारं आहे..!
अशाप्रकारे आजच्या लेखामध्ये आपण सुंदर सुविचार जाणून घेतलेली आहे.