झोपताना कसे झोपावे या संदर्भात ३० नियम… हे नियम पाळा आणि शरीरातील शेकडो आजार पळवून लावा ..!!

Uncategorized

मित्रांनो, वास्तूनुसार घरात कोणत्या दिशेला काय ठेवावे, कोणत्या दिशेला देवांचे फोटो असावे,कोणत्या दिशेत झाडं लावावी, कोणत्या दिशेने दरवाजा असावा, कोणत्या दिशेने स्वयंपाकघर असावं कोणत्या दिशेला पाय करून झोपावे असे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. काही नियमांना मनुस्मृति, महाभारत, विष्णुस्मृति, पद्मपुराण यांचा आधार देण्यात आला आहे. यातलेच काही वास्तुशास्त्राचे झोपायचे नियम आपण पाहणार आहोत. झोपताना या नियमांना लक्षात घेऊन झोपलात तर निरोगी आणि दीर्घायुष्य लाभतं.

 

१) पोटभर जेवण करून लगेच झोपू नका.

२) झोपण्याच्या एक तास आधी टीव्ही मोबाईल पाहणं थांबवा.

३) झोपताना मोबाईल किंवा लॅपटॉप जवळ घेऊन झोपू नका.

४) गोंगाटामध्ये झोपू नका.

५) झोपताना चहा, कॉफी, दारू अशी पेयं पिऊ नका

६) पालथं चुकूनही झोपू नका.

७) झोपताना तोंडामध्ये तंबाखू, सुपारी, गुटखा ठेवून झोपू नका.

८) दिवसा जास्त वेळ झोपू नका. रात्री उशिरा झोपू नका.

९) ओले पाय करून झोपू नये. कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो.

१०) पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते.

११. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात.

१२. उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो. सतत मृत्यूभय असते.

१३. दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते.

१४) देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये.

१५) झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये.

१६) विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे.

१७) “नग्न” झोपू नये.

१८) पूर्वेकडे डोके करून झोपू नये.

१९) निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे ०३.४० ते ४.२८ च्या दरम्यान उठले पाहिजे.

२०) पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये.

२१) सुनसान ओसाड घरात, तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये.

२२) तुटलेल्या खाटेवर तसेच उष्टया तोंडाने झोपू नये.

२३) दिवसा कधीही झोपू नका. दिवसा झोपल्याने आजार उद्भभवतात व आयुष्य कमी होते.

२४) सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य होतो.

२५) सूर्यास्ताच्या तीन तासांनंतर झोपले पाहिजे.

२६) डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

२७) यम आणि दुष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये. त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते. शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते.

२८) हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये.

२९) पलंगावर बसून खाणे/पिणे हे अशुभ आहे.

३०) झोपताना वाचन करू नये, असे केल्याने नजरदोष निर्माण होतो.

 

अशाप्रकारे या ३० नियमांचे अनुसरण केल्यामुळे निरोगी दीर्घायुष्य लाभते.

Leave a Reply

Your email address will not be published.