जेवणानंतर त्याच ताटात हात का धुवू नयेत जाणून घेतलं तर तुम्हाला सुद्धा…!!

Uncategorized

मित्रांनो, जेवणानंतर त्याच ताटात हात का धुवू नयेत? जाणून घ्या ह्यामागील सत्यता, यामागील रहस्य काय आहे, की जेवण केल्यानंतर आपल्याला ताटात हात का धुवू नयेत? सध्या गावांमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी असे दिसून येते आहे की अनेक लोक जेवण केल्यानंतर त्याच ताटात हात धुतात. त्यामुळे ताटात हात धुवू नयेत, यामागे काय रहस्य आहे, आज आपण जाणून घेऊया.

 

एक गरीब माणूस होता, गरीब कुटुंब होते. तो माणूस जेवायला बसला, तेव्हा त्याची पत्नी होती, तिने डाळ, भात, भाजी, पोळ्या ठेवल्या होत्या, लोणचं जे काही घरात होतं, ते सर्व साहित्य ताटात तयार करून ठेवलं.तो माणूस जेवायला बसला होता, तेवढ्यात दारात एक महात्माजी, भिक्षुक आले. ते एक संत होते, त्यांनी सांगितलं, ” भिक्षामं देही, हे भाऊ, मी खूप उपाशी आहे.काहीतरी जेवण मिळेल का? मी अनेक दिवसांपासून उपाशी आहे.”तो माणूस बेचारा जेवायला बसलेला होता , समोर ताट होतं, आणि दारात एक उपाशी माणूस आला होता.

 

त्या माणसाने आदरपूर्वक त्याला बोलावलं, “या महात्माजी, या मुनीजी, आपण कुठून आले आहात? आमचं भाग्य मोठं की तुम्ही आमच्या घरी आलात.” त्याने आसन लावलं. ते तपस्वी महात्मा होते. आसन लावून त्यांना जेवायला बसवलं. स्वतःचं सजवलेलं ताट त्यांनी महात्माजींसमोर ठेवलं. आता त्यांच्या घरात जेवण बनवलं होतं, ते त्यांच्या पत्नीने बनवलं होतं, ते अगदी थोडंसंच होतं, कारण घरात काहीच जास्त नव्हतं. ते गरीब लोक होते. जेवढं होतं, तेवढंच बनवलं होतं. थोडीशी डाळ होती, भात होता, भाजी होती, जे काही मिळालं होतं. ते सुद्धा कधी कधी मागून आणून खात होते. जे मिळतंय, तेच खात होते. आज त्यांचं जेवण त्यांच्यासाठीही थोडं कमी होतं. आता अतिथी आले, महात्माजी होते, पंडितजी होते.

 

त्यांना जेवायला दिलं. तो माणूस शांतपणे बसला आणि त्यांना जेवण देत राहिला. महात्माजी म्हणाले, “आणखी आणा, थोडं आणा.” त्यावर त्याच्या पत्नीने सांगितलं, ” फक्त दोन शेवटच्या पोळ्या आहेत, आणि तेवढ्याच उरल्या आहेत. ” जेव्हा त्याच्या पत्नीने सांगितलं की फक्त शेवटच्या दोन पोळ्या उरल्या आहेत, तेव्हा बाहेर बसलेल्या महात्माजींनी ऐकलं की यांच्याकडे आता फक्त दोन पोळ्याच उरल्या आहेत, बाकी काहीच नाही. तो माणूस दोन पोळ्या घेऊन आला आणि म्हणाला, “महाराज, हे प्रसाद घ्या.” महात्माजींना त्याने विचारलं, “दोन पोळ्या देऊ का?” त्यावर महात्मा म्हणाले, “नको, नको, आता नको.” त्यांनाही समजलं की आता हे गरीब लोक काय खाणार, म्हणून त्यांनी नकार दिला.

 

त्या माणसाने हात जोडून सांगितलं, “तुम्ही आमचे अतिथी आहात, तुम्ही पोटभर जेवा.महात्माजी म्हणाले, “ठीक आहे, एक ठेवा. मग एक पोळी ठेवली आणि एक पोळी उरली. आता अतिथींनी डाळ, भात, भाजी खाल्ली , आरामात पाच पोळ्या खाल्ल्या आणि पोटभर खाल्ल्यावर आनंदी झाले. पाच पोळ्या खाऊन त्यांचं पोट भरलं आणि ते त्यांच्या मार्गाने निघून गेले.आता फक्त नवरा-बायको उरले. त्यांनी सर्व भांडी बाहेर आणून ठेवली आणि ताट लावले. उरलेली थोडीशी भाजी होती, थोडीशी डाळ होती, एक वाटी अर्धी वाटी होती. त्यातून दोघांनी आपलं ताट तयार केलं. एक पोळी उरलेली होती, ती अभी अर्धी दोघांनी घेतली. थोडासा भात होता, तो अर्धा-अर्धा वाटून घेतला. मग त्यांनी दोघांनी जेवण केलं.

 

आपण विचार करा, अर्ध्या पोळीने कोणाचं पोट भरतं? दिवसभर त्या माणसाने काही खाल्लं नव्हतं. संध्याकाळीही काही मिळालं नाही. फक्त एकदाच जेवायला मिळतं, आणि नाश्ता काही झाला नव्हता.फक्त अर्धी पोळी मिळाली. त्यांनी ती अर्धी पोळी खाल्ली. दोघांनी थोडं खाल्लं. जसेच त्यांनी जेवण केलं, तेव्हा हात धुवायला गेले. पूर्वी लोक अंगणात बाहर जाऊन हात धुत असत. ही परंपरा आहे की ताटात हात धुतले जात नाहीत. तुम्हीही पाहिलं असेल, आणि आम्हीही पाहिलं आहे की लोक ताटात हात धुत नाहीत बाहेर जाऊन हात धुतात. आजही अनेक लोक आहेत, जे ताटात हात धुत नाहीत. इतक्या मोठ्या भंडाऱ्यात, जिथे रोज 30 ते 40 हजार लोकांचं जेवण बनतं, तिथेही कोणीही ताटात हात धुत नाही. ताटात हात धुण्याचा नियम नाही, ताटात हात धुवू नये.

 

खूप लोक असतात, जे घरात जेवण करतात आणि जेवण केल्यानंतर आजकाल आळस इतका वाढला आहे की वॉशबेसिनपर्यंत जाऊन हात धुवू शकत नाहीत, आणि तिथेच ताटात हात धुतात. हात कधीही ताटात धुवू नयेत. ताटात चांगल्या प्रकारे जेवण करा, आधी डाळ भात, भाजी, पोळी, जे काही तुमच्या ताटात आहे, ते एकेक दाणा देवाला अर्पण करा.. अनेक लोकांचं नियम असतो की जेव्हा जेवणाची थाळी त्यांच्या समोर येते, तेव्हा त्याच थाळीतून थोडंसे अन्न घेऊन देवाच्या नावाने खाली ठेवतात आणि मग जेवण स्वीकारतात. पाणी थाळीच्या चारही बाजूंनी फिरवतात आणि मग जेवण स्वीकारतात. देवाला भोग लावल्यावर ते जेवण राहत नाही, ते प्रसाद बनतं.

 

प्रसादाचा एकेक दाणा खाल्ला पाहिजे तो फेकू नये. म्हणून ताट व्यवस्थित स्वच्छ करून आधी जेवण करावं आणि ताटात हात धुवू नयेत. ताट व्यवस्थित धुवून घ्यावं. आता ते लोक, नवरा-बायको, त्यांनी अधी – अर्धी पोळी खाल्ली, जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर बाहेर हात धुण्यासाठी गेले. बाहेर त्यांनी हात धुतले, जिथे त्यांचं अंगण होतं. त्या अंगणात एक झाड होतं. त्या झाडाजवळ एक मुंगूस बसलेला होता. मुंगूस, ज्याबद्दल तुम्हाला माहिती आहे. साप आणि मुंगुसाच्या लढाईत मुंगूस जिंकतो.

 

तो मुंगूस तिथेच बसलेला होता. त्या व्यक्तीने हात धुतल्यावर त्यांचं पाणी मुंगुसाच्या शेपटीवर पडलं. शेपटीचा अघा भाग ओला झाला, आणि जसं शेपटीवर पाणी पडलं, तसं त्याचा रंग बदलला, तो सोनेरी झाला. त्या सोनेरी मुंगुसाने त्याची शेपटी पाहिली आणि त्या व्यक्तीला म्हणाला, “भाऊ, तुम्ही माझ्यावर पाणी टाकलं, तर बघा, माझा अर्धा मागचा भाग सोनेरी झाला आहे. माझा रंग बदलला आहे, माझी शेपटी सोनेरी झाली आहे. तुम्ही एक काम करा, माझ्या पूर्ण शरीरावर पाणी टाका, म्हणजे मी सुंदर होईन.” तो व्यक्ती म्हणाला, “नाही, मी तर माझे हात धुवून घेतले आहेत.” मुंगूस म्हणाला, “ठीक आहे, भाऊ. काही हरकत नाही. पण तुम्ही हे सांगा की तुमचं पाणी माझ्या शरीरावर पडल्यामुळे माझा रंग कसा बदलला, सोनेरी कसा झाला आता मला माझं पूर्ण शरीर सोनेरी करायचं आहे.

 

अर्ध सोनेरी झालं आहे, आता पूर्ण कसं होईल? उद्या मी परत येतो, आणि तुम्ही पुन्हा माझ्यावर हात धुवा.” तो व्यक्ती म्हणाला, “नाही, आता तू जा. धर्मराज युधिष्ठिरांच्या राज्यात जा. ते य करत आहेत. त्या यज्ञात खूप सारे तपस्वी महात्मा आणि खूप सारे ब्राह्मण आले आहेत. जिथे ते ब्राह्मण लोक आणि तपस्वी महात्मा हात धुतात, तिथे तू जा. धर्मराज युधिष्ठिर सर्वांना अन्नदान करत आहेत. खूप मोठा यज्ञ चालू आहे. जा, तुझा एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या ब्राह्मणाच्या किंवा एखाद्या तपस्वीच्या हात धुतलेल्या पाण्यामुळे तुझा रंग सोनेरी झाला, तर समज, धर्मराजांचा यज्ञ पूर्ण झाला, संपन्न झाला.

 

आता मुंगूस खूप आनंदी होऊन धर्मराज युधिष्ठिरांच्या राज्यात गेला, जिथे खूप सारे लोक जेवण करत होते. तपस्वी होते, एकापेक्षा एक महात्मा होते, आणि काही ब्राह्मणही होते. जिथे सर्व लोक हात धुत होते, तिथे मुंगूस जाऊन बसला. हजारों नव्हे, लाखो लोकांनी, ब्राह्मणांनी, महात्म्यांनी प्रसाद घेतला, आणि सर्वांनी हात धुतले, पण मुंगुसाचा रंग सोनेरी झाला नाही. आता सर्व लोक जेवण करून, दक्षिणा घेऊन ब्राह्मण निघून गेले. त्यानंतर धर्मराज युधिष्ठिर म्हणाले. अर्जन म्हणाला, “पहा, राजांची सभा भरली आहे ” त्या राजांच्या सभेत अर्जुन म्हणाला भीम म्हणाला, “पहा, आजपर्यंतच्या इतिहासात एवढं मोठं अन्नदान, जितकं आमच्या मोठ्या भावाने, धर्मराज युधिष्ठिरांनी केलं आहे, इतकं मोठं यज्ञ कुणीही केलं नाही इतकं मोठं यज्ञ कुणी केलं नाही, इतक मोठं अन्नदान कुणी केलं नाही इतकं सोने, चांदी, हिरे, मोती जे दान दिलं आहे, इतकं मोठं दान आजवर कुणीही केलं नाही.”

 

तेव्हा मुंगूस बोलू लागला. मुंगूस म्हणाला, “भीम भाऊ, शांत रहा. इथे कुठलाही यहा झाला नाही. यज्ञ तर एका गरीब माणसाच्या घरी झाला होता.” भीमने मुंगुसाला बोलावलं आणि विचारलं, “तू कोण आहेस?” मुंगूस म्हणाला, “भैया, मी मुंगूस आहे.” भीम म्हणाला, “मग तुझं शरीर सोनेरी झालं? अर्धं शरीर सोनेरी कसं झालं?मुंगूस असा तर नसतो. तुझं हे केस सोनेरी चमकत आहेत, असं कसं झालं?” त्याने सांगितलं, “भीम महाराज, इथे जवळच एक गाव आहे. त्या गावात एक गरीब माणूस राहतो, जो खूप श्रद्धा आणि भावनेने देवाला मानतो. त्याला जे काही भिक्षेमध्ये मिळतं, त्याचं जेवण बनवन खातो.

 

त्याने जेवण करून जसे हात धुतले, आणि त्याचं पाणी माझ्यावर पडलं, तसं माझं शरीर अर्ध सोनेरी झालं.” त्यांनी सांगितलं, “युधिष्ठिरांच्या यज्ञात जा . जर तुझं पूर्ण शरीर सोनेरी झालं, समज, त्यांचा यज्ञ पूर्ण झाला. पण ऐक भीम, तुझा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही. मी इथे बसलो आहे, भिजत राहिलो, पण माझं शरीर सोनेरी झालं नाही. आणि तुम्ही म्हणता, धर्मराजांनी एवढं मोठं यज्ञ केलं एवढं दान केलं. तो गरीब माणूस होता, आणि त्याच्या हात धुण्यामुळे माझं शरीर बदललं. इथे तर खूप लोकांनी खाल्लं, काही झालं नाही. इतक्या ब्राह्मणांनी खाल्लं, काही झालं नाही.”

 

आता श्रीकृष्णजी त्या सभेत बसले होते.श्रीकृष्ण मंद-मंद हसत होते. अर्जुन म्हणाला, “हे श्याम सुंदर, हा मुंगूस कोण आहे, आणि काय सांगत आहे? आम्हाला माहीत नाही. तुम्ही सांगा, यज्ञ पूर्ण झाला का नाही?” आता सभेत चर्चा होऊ लागली की धर्मराजांनी एवढे पैसे खर्च केले आहेत, पण त्यांचा यज्ञ पूर्ण झाला नाही. मुंगूस म्हणत आहे की यज्ञ तर पूर्ण झाला नाही. जोपर्यंत पूर्ण शरीर सोनेरी होणार नाही. तोपर्यंत यज्ञ पूर्ण मानला जाणार नाही, संपन्न होणार नाही. आता श्रीकृष्णजींना विचारलं, तेव्हा श्रीकृष्णजी म्हणाले, “ऐका, तुमचा यज्ञ अजून पूर्ण झाला नाही. म्हणूनच त्याचं शरीर अजून सोनेरी झालं नाही. जेव्हा तुमचा यज्ञ पूर्ण होईल, तेव्हा त्याचं शरीर नक्कीच सोनेरी होईल.”

 

अर्जुन म्हणाला, “प्रभु, माझ्या भावाने, युधिष्ठिरांनी, जितका मोठा यज्ञ केला, तसा यज्ञ आजवर कुणीही केला नाही. जर कुणी केला नाही, तर त्याचं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं नाही? हे सांगा. आधी तर एवढा मोठा यज्ञ कुणी केला नाही. आणि जर त्याचं पूर्ण शरीर सोनेरी होणार असेल, तर अजून त्याचं अर्ध शरीर सोनेरी कसं झालं नाही? हे मला जाणून घ्यायचं आहे.” तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, “मुंगूस सोनेरी कसा झाला? अर्जुन, हा मुंगूस त्य गावात गेला होता. तो एका गरीब माणसाकडे गेला, जो देवाला श्रद्धा आणि भावनेने स्मरण करतो आणि देवावर खूप श्रद्धा ठेवतो. त्याच्या मनात कुठलाही छल कपट नाही. सरळ स्वभावाचा होता. जसा तो जेवणासाठी बसला होता, तसाच एक अतिथी आला. त्याने आपले ताट पुढे केले आणि संतोषजनक जेवण त्याला दिले.

 

आपले संपूर्ण ताट त्याने अतिथीला अर्पण केले. त्यानंतर उरलेली अर्धी पोळी त्याने खाल्ली आणि अर्धी पोळी त्याच्या पत्नीने खाल्ली. संतोषजनक भावनेने त्यांनी अतिथीला जेवण दिले. जे मिळाले, ते ईश्वराचे आभार मानून, कोणताही संकोच न करता, प्रसन्नचित्त होऊन दोघेही नवरा- बायको आनंदी होते. ते संतोषी होते, खरे भक्त होते. त्या संतोषी भक्ताने हात धुतल्यावर त्याचे हात धुण्याचे मुंगुसाचा शरीरावर पडले, तेव्हा या मुंगुसाचे अधे शरीर सोनेरी झाले. अर्जुन म्हणाला, “प्रभु, हे काय आहे?” तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, “अर्जुन, तुझ्या भावाने करोडो रुपये खर्च करून जो यज्ञ केला, त्याने जितके पुण्य मिळाले नाही, त्यापेक्षा अधिक पुण्य त्या खऱ्या भक्ताला मिळाले. त्या संतोषी भक्ताला मिळाले ज्याने एका खऱ्या तपस्वीला जेवण दिले. का? कारण तुझ्याकडे करोडो रुपये आहेत , म्हणून तू करोडो खर्च करू शकतोस.

 

पण त्या व्यक्तीकडे फक्त एक ताट जेवण आणि चार-सहा पोळ्या होत्या. त्याने त्याचे संपूर्ण दान केले, जे त्याच्याकडे सर्वस्व दान केले, तेव्हा त्याला अधिक पुण्य मिळाले. त्याच्या सर्वस्वाच्या नावावर फक्त ताटातील जेवणच त्याची संपत्ती होती, तीच त्याची मालमत्ता होती.” अर्जुन म्हणाला, “आता याचे पूर्ण शरीर कसे सोनेरी होईल?” तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, “तुझ्या राज्यात कोणी भुकेला आहे का, आधी त्याला शोधा.” शोध घेतला, तर कळाले की जंगलात एक महात्मा उपाशी बसले होते, तपश्चर्या करत होते. धर्मराजांच्या यज्ञात सर्व ब्राह्मणांनी जेवण केले होते, पण एका व्यक्तीने केले नव्हते. तो तपस्वी तिथे बसलेला होता. त्या महात्म्याला बोलावण्यात आले, विनंती करण्यात आली की चला, आपण जेवण करा.

 

त्यांना जेवण दिले गेले, आणि जसे त्यांनी हात धुतले, त्यांचे हात धुण्याचे पाणी मुंगुसाच्या शरीरावर पडले, आणि त्याचे पूर्ण शरीर सोनेरी झाले. पुढपासून मागेपर्यंत तो एकसारखा सोनेरी झाला आणि त्याचे केस अगदी सोन्यासारखे चमकायला लागले. तिथे एक घंटा बांधलेली होती, आणि ती आपोआप टनटन वाजू लागली. “युधिष्ठिर तुमचा यज्ञ संपन्न झाला.” यज्ञ कधी संपत्र होतो? जेव्हा जेवण दिले जाते. कोणताही यज्ञ करा, पण जोपर्यंत अन्नदान गरजू लोकांना करत नाही, खऱ्या संत, ऋषी, मुनिंना दान करत नाही, तोपर्यंत तो यज्ञ पूर्ण होणार नाही. त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेल्यांना जेवण देणे अन्नदानाचा यज्ञ असतो. तुम्ही इतर कोणत्याही यज्ञामध्ये जास्त गुंतू नका. गरजू, भुकेल्या व्यक्तींना जेवण द्या, तोच सर्वात मोठा यज्ञ आहे. त्यामुळे खऱ्या मनाने केलेले दान, गरजूला केलेले दान आणि भुकेल्यांना दिलेले जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा कमी नाही.

 

अशाप्रकारे जेवण झाल्यानंतर ताटात का हात धुऊ नये. याबद्दलची कथा आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेतलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.