मित्रांनो, सुविचार हे असे असतात की ज्याचा प्रभाव आपल्या जीवनावर खूप मोठा फायदा असतो. काही सुविचारांमधून आपल्याला शिकवण मिळत असते तर काही सुविचारांमधून जीवन बदलण्यास मदत मिळत असते. आपल्याला खूप मोठी शिकवण हे मिळत असते. असेच काही आपले जीवन बदलणारे सुविचार आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
“आयुष्यात व्यवहार तर खुप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही.
जे लोक नेहमी तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात ते तेव्हाच थांबतील जेव्हा तुम्ही त्यांचा ‘निकाल’ लावण्याचं सामर्थ्य ठेवाल.
“नेहमी सुरळीत घडते म्हणून आत्मविश्वास वाढत नाही, चूक होईल ही भितीच नसल्याने तो वाढतो”.
शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतः च्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचशे शत्रू आपल्याच आसपास सापडतील.
जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे, तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.
“एका रात्रीत यश मिळत नसते त्याच्या मागे बरीच वर्षाची मेहनत असते.”
“जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, ही संकल्पना पालक आणि विद्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही”
” केवळ आत्मविश्वास महत्त्वाचा नाही, त्याला शक्तीची जोड आवश्यक असते”
” आनंदी आणि चांगले दिवस यावेत म्हणून वाईट काळात झगडावेच लागते ”
एका कुंभाराला एका व्यक्तीने विचारले तू चिलीम बनवतोय तर मडके का नाही बनवत आता तर उन्हाळा येणाराय कुंभाराने चिलीम बनवायचे सोडून मडके बनवायला घेतले तेव्हा त्या मातीने विचारले तू चिलीम सोडून मडके का बनवतोय, कुंभार बोलला, माझा विचार बदलला त्यावर मातीने त्याला उत्तर दिले तुझा विचार बदलला माझा आकार बदलला विचार बदलला की जीवनाचा आकार ही बदलतो.
एखाद्याच्या दुःखाचा कधीही अनादर करू नये प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही.
पैसे देऊन औषध मिळते, पण आरोग्य मात्र कधीही पैसे देऊन मिळत नाही पैशांनी पुस्तकांची चळत विकत मिळते, पण ज्ञान मिळत नाही, कष्टानेच ते मिळवावे लागते.
पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो., त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते नशीबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशीबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते.
“आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवासारखीच असतात काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी पानासारखी, अर्ध्यावर साथ सोडणारी काही काही काट्यासारखी, सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी, न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी.
अशा प्रकारे हे काही सुंदर सुविचार आहेत याकडे जेवण बदलण्यासाठी आपल्याला मदत करतात.