मित्रांनो, सिंधुताई सपकाळ या हजारो अनाथांच्या आई झाल्या. अनेक अनाथांना त्यांनी आपल्या आश्रमामध्ये आणून जतन केले. त्यांच्यासाठी जे काय हवे ते करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या काही घटना त्यांनी का भाषणातून सांगितलेले आहेत त्याच भाषणाबद्दलची माहिती आजच्या रेखातून आपण जाणून घेणार आहोत.
ज्यांच्यामुळे सिंधुताई सपकाळ यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली होती. त्या सर्वांना त्यांनी माफ केलं. याविषयी बोलताना सिंधुताई म्हणतात, “वाईटातून चांगलंही घडतं. फक्त चालत राहणं आपल्या हातात आहे. कशाचीही खंत बाळगू नका. मी माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं जर काय काम केलं असेल, तर दगडं मारून हाकलून देणाऱ्या माझ्या पतीला मी माफ केलं. तसंच मला साथ न देणाऱ्या आईलाही माफ केलं.”
“माझ्या सासर-माहेरने माझा सत्कार केला. माझ्या सत्काराच्या वेळी माझा पती रडत होता. त्याने हाकललं तेव्हा मी रडत होते. आयुष्य कसं बदलतं पाहा.””माझ्या सत्कारात ते रडत होते. त्यांना रडताना पाहून मला खूप बरं वाटत होतं. पण क्षणभर बरं वाटलं आणि विचार आला, चुकतेयस सिंधुताई. पण खरं सांग, त्यांनी तुला सोडलं नसतं, तर तू 14 देशांत भाषणं ठोकून आली असती?”
त्या पुढे म्हणतात, “त्यांनी सोडलं नसतं, तर 750 पुरस्कार, अनाथांची माय अशी ओळख तुला मिळाली असती?सिंधुताई, त्यांना माफ कर, असा विचार माझ्या मनात प्रकट झाला. मी त्यांच्या जवळ गेले, त्यांचा हात हातात घेऊन कुरवाळला. इतकी जिव्हाळ्याची वागणूक दिल्यामुळे माझ्या पतीच्या डोळ्यात पाणी आलं.”त्यांना सिंधुताई म्हणाल्या, “तुम्ही मला हाकललं, तेव्हा मी रडत होते. आता तुम्ही रडताय. कुणीच कुणाचं नसतं ना? तुम्ही मला हाकललं तेव्हा माझ्या पातळाला गाठी होत्या. आज माझ्या पातळाच्या गाठी नाहीत. पण तुमच्या धोतराला गाठी आहेत.”
त्या म्हणतात, “हे ऐकून ते जोरजोरात रडू लागले. मी त्यांना रडू दिलं. माझ्या पदराने त्यांचं तोंड पुसलं. तुम्ही सोडलं म्हणून माझ्याकडून घडलं. आता मला तुमच्या सेवेची संधी द्या.” सिंधुताई यांनी त्यावेळी आपल्या पतीला संस्थेत आणलं. तू आता नवरा नाहीस तर माझं लेकरू म्हणून इथं आला आहेस, असं त्या म्हणायच्या. इतर लेकरांप्रमाणे तुझीही सेवा करू असं त्या म्हणत असत. त्या इतर मुलांना म्हणत, “बेटा, हे माझं सगळ्यात खतरनाक बाळ. यांनी सोडलं नसतं तर तुम्हाला आई मिळाली असते का रे? म्हणून आता तुम्ही त्यांचे मायबाप व्हा. त्यांना लेकराप्रमाणे सांभाळा. त्यांचं रिकामी काळीज भरून काढा. त्यांनी तुम्हाला आई दिली. आता तुम्ही त्यांचे गणगोत व्हा.”
सिंधुताई कधीही आश्रमात जात, तेव्हा त्यांची भेट त्यांच्या नवऱ्याशी होत असे. पण त्यांचे पती सिंधुताईंशी काहीच बोलायचे नाहीत. एकटक डोळ्यात पाहात ते बसायचे, असा उल्लेख सिंधुताईंनी आपल्या भाषणात केला आहे. त्याचबरोबर त्या एकदा अमेरिकेमध्ये भाषणासाठी गेला होता. त्यावेळी आपल्या देशाला इतर देश माता म्हणून संबोधित आहेत. हे बघून त्यांना खूप अभिमानास्पद झाले. त्यात ज्या ठिकाणी भाषणासाठी जायचं त्या ठिकाणी त्यांनी आपल्या अनाथ मुलांना जतन करण्यासाठी पदर पसरून मागत होत्या. देशात आपल्या भारत देशाला माता संबोधले जाते त्या देशात त्यांना हे करण्याची इच्छा झाली नाही. पण त्या ठिकाणी नमक्ता अनेक जणांनी अनेक रुपये दिले. त्यामुळे त्यांची पुण्यामध्ये एक आश्रम तयार झाले.
आज त्यांचे अनेक मुले एमबीए, बीबीए अशा मोठ्या मोठ्या पदांवर अभ्यास करत आहेत. त्या जरी चौथी शिकला असला तरी त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी काहीही कमी पडून राहिली नाही आहे. त्या आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कमतरता पडू देत नाहीत. त्यांनी अगदी चौदा दिवसाचे बाळ देखील रस्त्यावर पडलेले उचलून आणून त्याला जतन केलेलं आहे.
अशाप्रकारे सिंधुताई सपकाळ यांची कामगिरी खूप मोठी आहे. त्यांनी अनेक अनाथांसाठी खूप काही केलेले आहे व त्यांची आई झालेले आहेत.