घरातील कोणतेही पीठ वापरून बनवा ही मॅजिक पावडर, भांडे चमकतील आणि हात राहतील मुलायम घरच्याघरी पितांबरी…..!!

Uncategorized

मित्रांनो, बहुतांश घरांमध्ये तांबे, पितळ आणि अल्युमिनियम, स्टील सारखी भांडी पॉलिश करण्यासाठी पितांबरी पावडर वापरली जाते. शिवाय विशेष प्रसंगासाठी लागणारी ही भांडी लक्ख करण्यासाठी गृहिणी पितांबरीचा वापर करतात. बाजारात पितांबरी पावडरची किंमत सुमारे ₹100 प्रति किलोने विकली जाते. तर अनेक बँड यापेक्षा जास्त किमतीत ही पावडर विकतात.

 

त्यामुळे पैसे खर्च करून बाजारातून पितांबरी विकत घेण्यापेक्षा, घरातच ही पावडर बनवू शकता. घरात पितांबरी बनवणे अगदी सोपे आहे. शिवाय ही पावडर अगदी बाजारातल्या पितांबरी सारखीच असते आणि भांडी ही अगदी मस्त चमकतात. अनेक महिलांना चिकट आणि घाणेरडी भांडी साफ करताना खूप त्रास होतो, त्यामुळे त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप उपयुक्त ठरू शकते, त्यामुळे आज आपण घरी पितांबरी बनवण्याची पद्धत जाणून घेणार आहोत.

 

यामध्ये आपल्या घरगुती साधनांचा वापर करायचा आहे. ज्यात आपण आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही प्रकारचे पीठ वापरू शकतो. जसे की तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ किंवा ज्वारी पीठ किंवा बेसन पीठ त्यापैकी कोणतेही पीठ तुम्ही अर्धी वाटी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये प्रत्येकी तीन तीन चमचे याप्रमाणे आपला मीठ, धुण्याचा सोडा आणि सायट्रिक ऍसिड इ. पदार्थ घ्यायचा आहे. हे मिश्रण सर्व साहित्य मिक्सरमध्ये चांगले बारीक करा.

 

अशाप्रकारे तुमची पितांबरी पावडर तयार झाली आहे. ही पावडर तुम्ही हवाबंद डब्यात साठवू शकता. घरात बनवलेली ही पावडर खोलीच्या तपमानावर सुमारे 6 महिने साठवता येऊ शकते. ही पावडर डोळ्यांत जाऊन देऊ नका. जर ते त्वचेच्या संपर्कात आली तर लगेच धुवा. लहान मुलांपासून दूर ठेवा. तुम्ही पितांबरीने कोणतीही धातूची भांडी स्वच्छ करू शकता, परंतु पितळ आणि तांब्याचा रंग पॉलिश करण्यासाठी ती खूप प्रभावी आहे. भांडी चमकदार करण्यासाठी, ही घरगुती पितांबरी स्क्रबरमध्ये लावा, नंतर भांडी घासून घ्या. अगदी जुनी भांडी देखील 5 मिनिटांत चमकतील.

 

अशा प्रकारे ही पावडर तुम्ही घरी बनवून भांडी चकचकीत करु शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.