गोड गोड बोलून शेवटी धोका देणारी माणसे कशी ओळखावी? विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींची ही ११ लक्षणे….!!

Uncategorized

मित्रांनो, आजकाल सर्वांनाच माहित आहे की अनेक लोक आपला विश्वासघात करत असतात. ते आपल्या तोंडावर गोड गोड बोलतात पण शेवटी ते आपल्याला धोका देतात. या धोका देणाऱ्या माणसांना कसे ओळखावे? जेणेकरून आपण त्यांच्यापासून दूरच राहता येईल. त्यामुळे आपला धोका सुद्धा होणार नाही व विश्वासघात देखील होणार नाही. अशा व्यक्तींची 11 लक्षणे आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी त्या व्यक्तीचा व्यक्तीला अधिक पडताळून पहा की ती व्यक्ती खरच विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहे का? म्हणजेच ते व्यक्ती तुमच्या दुःखामध्ये तुमचा सोबत होती का? ज्यावेळी आपली परिस्थिती चांगली असते त्यावेळी सर्वच जण आपल्याशी गोड गोड बोलत असतात. परंतु ज्या वेळेला आपल्याला खरंच खूप त्यांच्या गरज असते त्यावेळी कोणती व्यक्ती आपल्या सोबत आहे तीच व्यक्ती आपली हितचिंतक असते.

 

म्हणून असाच व्यक्तींवर विश्वास ठेवा की जी आपल्या सदैव सोबत असतील. जे आपल्या सुखात आणि दुःखात कायम आपला सोबत राहते. तीच व्यक्ती विश्वास ठेवण्याची लायकीचे असते. या उलट जी व्यक्ती आपली जेव्हा परिस्थिती चांगली असते त्यावेळी आपल्या सोबत गोड गोड बोलते आणि नंतर आपल्या वाईट काळामध्ये ती आपल्या आपल्याला सोडून जाते या व्यक्ती कधीही विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसतात. अशाच काही लक्षणे ज्या व्यक्ती आपल्याला धोका देतात त्यांची माहिती आज आपण घेणार आहोत.

 

जी व्यक्ती इतरांची गुपित तुम्हाला बिनधकपणे सांगते ती व्यक्ती तुमची देखील सिक्रेट्स इतर व्यक्तींना सांगण्यासाठी पुढे मागे पाहत नाही. अशी व्यक्ती नक्कीच आपल्याला धोका देते. या व्यक्तींवर कधीही आपण विश्वास ठेवू नये. जी व्यक्ती आपल्याशी बोलताना दुसऱ्यांची उणे धुणे काढते की हा असाच आहे तो तसाच आहे ती व्यक्ती देखील विश्वासास पात्र नसते. ज्या व्यक्ती चारित्र्यही, कपटी असतात, स्वार्थी असतात व आप्रामाणिक असतात अशा व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नये. जी व्यक्ती तुमच्या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या सोबत असते. तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. तुमची गुपिते कोणालाही सांगत नाही अशी व्यक्ती विश्वास पात्र असते.

 

पैशाच्या बाबतीत म्हणायचं झाले तर आपण एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचे झाले तर त्याचे आधी चौकशी केली पाहिजे. कारण लोकांच्या मनामध्ये लोभ निर्माण होण्यास वेळ लागत नाही आणि यामुळेच आपण त्याची थोडी पार्श्वभूमी तपासून घेतले पाहिजे. त्यामध्ये या व्यक्तीने आधी कोणाकडून पैसे घेतले होते का? तो पैशाच्या बाबतीत फ्रॉड तरी करत नाही ना? पैसे घेतल्यावर तो वेळेवर परत करतो ना? या गोष्टीचे चौकशी आधी आपण करावी. मगच तिला पैसे द्यावे. आपला हिंदू धर्मामध्ये सांगितलेले आहे की जो जसा बोलतो तसेच तो करतोय त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवले पाहिजे.

 

जर एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडे कोणतीतरी एखादी वस्तू मागितली तर ती देण्याआधी ती व्यक्ती विश्वासास पात्र आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण त्या व्यक्तीला ती वस्तू देण्यासाठी जरा टाळाटाळ करावी. यावरती व्यक्तीच प्रतिक्रिया जर उनेदूने बोलू लागले किंवा खूप राग आला तर ही व्यक्ती विश्वासात पात्र नाही. हा माणूस तुमच्याशी कोणता तरी फायदा करून घेण्यासाठीच गोड गोड बोलत आहे. या उलट तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर तुमचे एखादी वस्तू मागितली की मला या वस्तूची खूप गरज आहे आणि तू मला या यावेळी साठी वस्तू दे. त्यानंतर मी तुला परत करेल. जर त्या व्यक्तीने कोणताही विचार न करता तुम्हाला ते वस्तू दिले तर नक्कीच ती व्यक्ती विश्वासास पात्र आहे.

 

आणि जर त्या व्यक्तीने तुम्हाला ती वस्तू देण्यासाठी नकार दिला तर नक्कीच ती व्यक्ती फक्त तुमचा फायदा पुरता वापर करते. त्यामुळे ती व्यक्ती विश्वासास पात्र नसते. व्यक्ती विश्वास घातकी असते त्या व्यक्ती खोटारडे असतात व याआधी त्यांनी कोणाला कोणाला तरी विश्वासघात केलेला असतो. दुःख दिलेला असतो. धोका दिलेला असतो. ज्या व्यक्ती विश्वासघात करणाऱ्या असतात त्या व्यक्ती त्यांनी दिलेला शब्द कधीही पाळत नाहीत. जी व्यक्ती विश्वासघात करणारी व धोका देणाऱ्या असतात त्या व्यक्ती सतत इतरांची उनी धूनी काढत असतात.

 

त्याचबरोबर त्या व्यक्ती खूप स्वार्थी असतात. स्वतःचा सार्थ साधून घेण्यासाठी ती इतरांची गोड गोड बोलत असतात. या धोका देणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्यांच्या जीवनाशी काहीही घेणं देणं नसत. ते फक्त स्वतःचा विचार करत असतात. दुसऱ्याचं दुःख त्या कधीही समजून घेत नाहीत. जर एखादी वाईट गोष्ट घडली तर त्याचे खापर दुसऱ्यांच्या कपाळी ते फोडत असतात.

 

या व्यक्ती कधीही कसल्याही प्रकारची जबाबदारी स्वतःवरती घेत नाहीत. या व्यक्ती दुसऱ्या वरती कंट्रोल साधण्याचा प्रयत्न करतात. एक प्रकारचे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर ज्या व्यक्ती व्यसनी आहेत त्या व्यक्तीने देखील कधीही विश्वास ठेवू नये. हे त्यांच्या मनाच्या लहरीवर बोलत असतात.

 

अशाप्रकारे आपण विश्वासघाती व्यक्तींची लक्षणे कोणकोणते आहेत. याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.