मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता, मग ती व्यक्ती मुलगा असेल किंवा मुलगी. ती जेव्हा तुम्हाला मनापासून आवडते, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडता. यावेळी तुमची मैत्री ही होते. तुम्ही त्या व्यक्तीत गुंतत जाता. परंतु या वेळी तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, तो किंवा ती ही व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल का? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. आणि असं सर्वच लोकांच्या बाबतीत होतं. आज आपण आपला पार्टनर आपल्याशी खरं प्रेम करतो आहे की खोटं प्रेम हे ओळखण्यासाठी काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
मी जॉब वर आहे फोन करतो तो माझ्याशी खरंच प्रेम करतो आहे का नाही? हा प्रश्न तसा किचकट नाही आहे, आपण तो करत असतो. आणि मग जोडलेलं नातं क्षणात तुटून जातं. असं होऊ नये म्हणून आपण या लेखातून काही महत्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत. त्या द्वारे तुम्ही ओळखू शकता की, ती व्यक्ती खरच तुमच्या प्रेमात आहे का?. मुलगी असो किंवा मुलगा, जेव्हा ते प्रेमात पडतात तेव्हा त्यांच्यात अनेक मानसिक आणि शारीरिक बदल होतात, ज्यामुळे त्यांचे प्रेम खरे आहे की खोटे, हे जाणून घेणे त्यांना कठीण जाते. ती व्यक्ती मनाने आणि हृदयातून एक होते.
जेव्हा तुम्ही प्रेमात असता, तेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, त्याच्यासाठी खास असण्याची भावना हळूहळू तुमच्या मनात निर्माण होते. अशी भावना मानवी मेंदूमध्ये असलेल्या “डोपामाइन” नावाच्या विशेष रसायनामुळे होऊ लागते आणि अशी विशेष भावना मुलगा आणि मुलगी दोघांनाही होते.नेहमी त्याच्याकडे सकारात्मकतेने पाहते. जर तिचे तुमच्यावर खरोखर प्रेम असेल तर, ती तुमच्या सकारात्मक गोष्टींकडेच अधिक स्पष्टपणे लक्ष देईल. ती नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देत नाही.
अर्थातच तिला त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे नसते. तिला तुमच्या संबंधात येणारे सर्व काही काळ, वेळ, आठवणी यांपासून दूर जायचे नसते. ती तुमची काळजी घेऊ लागते. यावरून हे सिद्ध होते की, ती व्यक्ती तुमच्या खरच प्रेमात आहे. कारण हे सर्व आपल्यावर प्रेम करणारीच व्यक्ती करू शकते. मानसिक आणि शारीरिक बदल स्वीकारते. जेव्हा ती तुमच्याकडे येते, तेव्हा ती तिच्या/त्याच्या मनातील सर्व गोष्टी तुमच्याशी शेअर करते. अर्थातच ती सर्व गोष्टी हृदयातून बोलत असते. त्याला तुमची कंपनी खूप आवडू लागते. आणि हे साहजिकच आहे की, अशा वेळी ती व्यक्ती थोडी घाबरू लागते.
मन चलबिचल होते. ती त्याच्या दृष्टीकोनातून स्वतःला बघू लागते. त्याच्या चुकीच्या बोलण्याने, ती व्यक्ती सोडून तर जाणार नाही ना.. असे विचार त्याच्या मनात ढगांसारखे बरसू लागतात. त्याच्या विचाराने त्याचे मन घाबरू लागते. पण प्रेमात व्यक्ती समजूतदार होते असे म्हणतात. त्याला काहीतरी नवीन करून बघायला आवडते. ती त्याच्या वेळेनुसार तिची वेळ ठरवते. त्याच्या वेळेनुसार ती तिच्या दिनक्रमात बदल करते. असं खूप काही प्रेमात असणाऱ्या व्यक्तीत दिसून येतात. ती तुम्हाला जितका होईल तितका वेळ द्यायला तयार असतो. तुम्हाला कोणत्याही बाबतीत इग्नोर करण्याचा प्रयत्न करत नाही.
पूर्णतः विश्वास ठेवते. जेव्हा ती तुमच्या प्रेमात असते, तेव्हा ती तिला पूर्णतः तुमच्यात झोकून देते. ती असं तेव्हा करते, जेव्हा तिचा विश्वास तुमच्यावर अधिक आसतो. कळत-नकळत ती तुम्हाला सर्वकाही मानते. आणि या सर्व गोष्टी फक्त विश्वासामुळे होतात. तो / ती खरंच तिच्या प्रेमात आहे का? प्रत्येकजण या वाक्याकडे भावनिक नजरेने पाहतो. समाजात बदल होत आहेत, परंतु तरीही प्रेमासारख्या भावनिक शब्दांवर भेदभाव सुरू होत आहेत. प्रेम हा खेळ नसून दोन मनांचे मिलन आहे.
अशा नात्यात थोडीशी चूकही दोघांवर फोडली जाऊ शकते. म्हणूनच प्रेमात पडताना एकमेकांना मनापासून जाणून घेणे आवश्यक आहे. तो/ती खरंच तुमच्यावर प्रेम करते का? हा प्रश्न एका फटक्यात सोडवणं इतकं सोपं नाही. कारण हा मनाशी निगडीत प्रश्न आहे आणि मनाच्या पुढे कोणीही धावू शकत नाही, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणूनच प्रेमात पडण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मनावर ताबा ठेवायला शिकावे लागेल. तरच तुम्ही प्रेमासारख्या मजबूत शब्दाचा आदर करायला शिकाल.
अशाप्रकारे समोरच्या पार्टनर आपल्याशी खरं प्रेम करतोय की खोटं प्रेम. हे आपल्याला कळू शकते.