मित्रांनो, आपला प्रत्येकांची इतरांसोबत कोणते ना कोणते नातेही जोडलेले असतात. त्या नात्यांवर आपण मनापासून प्रेम करत असतो. नात्यांमध्ये कधीही दुरावा येणार नाही याची खात्री घेत असतो. आपल्यामुळे आपल्या नात्यात कधीही दुरावा करू नये असे सर्वांनाच वाटत असते. परंतु नातांमधील खरं प्रेम ओळखणं खूप गरजेचं असतं. तरच आपलं जीवन आनंदी होईल. म्हणूनच आज आपण त्यामधील खरं प्रेम ओळखण्यासाठी काही सुंदर सुविचार पाहणार आहोत.
नात्यांची दोरी फार नाजूक असते एकदा तुटली की परत जोडता येत नाही, जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते, नातं टिकवण्यासाठी जबाबदारी दोघांची असते, एकाचं चुकलं तर दुसऱ्यानं ताणायचं नसतं.
गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाहीत, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत ! !!
परिस्थिती अशी निर्माण करू नका जे आपला आत्मविश्वास बदलून टाकेल, उलट आत्मविश्वास असा ठेवा! जो आपली परिस्थिती बदलून टाकेल.
आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत साथ देता आली पाहिजे! मग वेळ खराब असो किवा चांगली !! तर ते प्रेम खरं मानलं जातं !
कधीकधी आपलीच माणसं आपल्या काळजाला लागेल असं बोलतात, तेव्हा वाटतं, की खरंच आपली माणसं आहेत का..? कारण आपली माणसं तर न बोलता आपल्याला समजून घेतात आणि आता आपली माणसंच जर परक्यासारखं वागायला लागली, तर आपलं म्हणायचं कोणाला…?
ज्यांना जगता येतं ना… ते कोणत्याही सुविधा शिवाय सुद्धा खुश दिसणार. ज्यांना जगता येत नाही ते सर्व सोयी-सुविधा असून सुद्धा दुःखीच दिसणार.
दुसऱ्याच्या वेदनेची सल ज्याला जाणवते ती नात्यातील सर्वोत्तम व्यक्ती असते.
सल्ल्यातून शहाणपण नक्कीच मिळतं पण अक्कल ही अनुभवातून मिळवावी लागते.
ज्या दिवसापासून आपण इतरांचा दोष शोधणं थांबवेल, त्याच दिवसापासून समजावं, आपण शांतीच्या मार्गावर चालू लागलोय !
आयुष्यात मागं वळून पाहणं अनुभव देतं, पुढे पाहण्यानं आशा मिळते आणि स्वतःच अंतर्गत पाहणं आत्मविश्वास देते.
खऱ्या नात्याचं सौंदर्य एकमेकांच्या चुका सहन करण्यात असतं कारण जर मानव कमतरताच शोधत बसला तर तो जगात एकटाच राहील.
आयुष्यात असा विचार ठेवा हरवलं त्याचं दुःख नको, परंतु जे भेटेल ते कशामुळं कमी नाही! जे नाही ते एक स्वप्न आहे परंतु जे आहे ते सर्वोत्तम आहे.
मरण कोणाला चुकलं नाही म्हणून जगणं सोडून द्यायचं नसतं, फुकटच मिळालं आहे म्हणून आयुष्य कसंही उधळायचं नसतं!
पिकलेले फळ तीन गुणावरून ओळखले जाते एक तर ते नरम होते दुसरे ते अतिशय गोड लागते आणि तिसरं म्हणजे त्याचा रंग बदलतो.
त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा तीन गोष्टीवरून करावी, प्रथम त्यात नम्रता असते दुसरं त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.
काही लोकं आपल्या भावना कधीच समजून घेणार नाहीत त्यांना फक्त त्यांचीच बाजू बरोबर दिसते.
जगामध्ये जरा सांभाळून चला कारण लोकं स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्यासोबत असल्याचे ढोंग रचतात.
श्वास आणि विश्वास दोन्ही अदृष्य आहे परंतु दोघात इतकी ताकत आहे की अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात.
लोकांचे कान भरून किवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं! आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते.
आपल्या जीवनात कधी कधी खूप चांगली माणसे येतात परंतु आपल्याला ते कळत नाही आणि अचानक एक दिवस ती माणसे आपणास सोडून जातात.
मग ती माणसे आपल्यातून निघून गेल्यावर त्यांचे महत्व कळतं, नंतर कितीही पश्चाताप केला तरीही काही उपयोग होत नाही, यालाच म्हणतात रात्र सरली पण गोष्ट मात्र उरली.
एखाद्यावर विश्वास एवढा ठेवा की विश्वासघात केल्यावर त्याला फक्त त्याची लायकीच जाणवली पाहिजे.
अशाप्रकारे हे सुविचार आहेत. ज्यामुळे आपल्या नात्यात असलेले खरं प्रेम आपल्याला ओळखता येईल.