मित्रांनो, आपण कितीही स्त्री पुरुष समानता आहे असं म्हटलं तरी अजूनही स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळी वागणूक दिली जाते, हे नाकारता येणार नाही. स्त्रियांना आजही दुय्यम वागणूक दिली जाते. सतत इतरांची काळजी करणारी, चुल आणि मुल या कर्तव्यात स्वतःला झोकून देणारी अशी स्त्रियांची प्रतिमा समाजाने करून ठेवली आहे. मात्र या सगळ्यांमध्ये स्त्रियांना काय हवं असतं, हा प्रश्न कधीच चर्चेत येत नाही. असं म्हणतात स्त्रियांच्या मनात एकाचवेळी अनेक विचारांची घालमेल सुरु असते.
तिच्या मनात नक्की काय चाललं आहे हे सहजा सहजी ओळखता येत नाही. मात्र सुखी आणि आनंदी कुटुंबासाठी स्त्रियांच्या मनात काय चालू आहे, हे समजून घेणे फार आवश्यक असतं. स्त्रिया कधीच त्यांच्या अपेक्षा विषयी जाहीरपणे बोलत नाहीत. परंतू त्यांच्या सुद्धा काही गरजा असतात. पुरुषाकडून या गरजा पूर्ण होतील असे त्यांना वाटत असते. त्यामुळे स्त्रियांच्या मनातील या गरजा ओळखणे फार महत्वाचे आहे. स्त्रियांना त्यांच्या मनातील इच्छा ओळखणारे पुरुष सर्वात जास्त आवडत असतात. मनातल्या इच्छा ओळखणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया लगेच आकर्षित होतात. मात्र स्त्रियांच्या नेमक्या पुरुषाकडून कोणत्या अपेक्षा असतात हे आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
स्त्री नेहमी प्रेमाच्या शोधात असते. आपल्यावर कोणी तरी मनापासून प्रेम करणारं असावं, अशी तिची इच्छा असते. काळजी आणि आपुलकीतून प्रेमाचे दर्शन घडते. त्यामुळे स्त्रीची नेहमी काळजी घेतली पाहिजे. तिच्यासोबत वेळ घालवून तिची आपुलकीने विचारपूस करणं आवश्यक असतं. तसेच स्त्रियांना सुद्धा प्रेम व्यक्त करण्याची इच्छा असते. स्त्रिया प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळण्याची संधी शोधत असतात. त्यामुळे तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे.
स्त्रियांना कौतूकाची अपेक्षा असते. त्यांच्या छोट्या-छोट्या कृतीचे कौतूक केले पाहिजे. स्त्रियांचे कौतूक केल्याने त्यांना फार आनंद होतो. त्यांच्यातील उत्साह द्विगुणित होतो. त्यामुळे त्यांनी केलेले पदार्थ असोत किंवा एखादी कलाकृती असो त्याचे तुम्ही मनापासून कौतुक केले पाहिजे. याशिवाय त्यांना नटण्याची खुप इच्छा असते. त्यामुळे स्त्रिच्या सौंदर्यांचे सुद्धा तुम्ही भरपूर कौतूक केले पाहिजे. मधुर शब्दात कौतूक करणाऱ्या पुरुषांवर स्त्रीया नेहमी जीव ओवाळून टाकतात.
संशयी स्वभावाचे पुरुष स्त्रियांना कधीच आवडत नाहीत. आपल्या पार्टनरवर कधीच संशय घेऊ नका. स्त्रियांवर संशय केल्यास त्यांना प्रचंड दुःख होते. त्यामुळे तुमचा त्यांच्यावर विश्वास असल्याचे त्यांना सांगत राहा. संशयामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. स्त्रियांना नेहमी सत्य बोलणारे पुरुष आवडतात. त्यामुळे नेहमीच त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सत्य बोला. त्यांना तुमच्या रोजच्या जिवनातील घडामोडीबद्दल सांगत राहा.
स्त्रियांना जास्तीत जास्त वेळ देणारे पुरुष आवडत असतात. एकमेकांसोबत वेळ घालवल्याने अतुट नाते निर्माण होते. त्यामुळे तुमचा जास्तीत जास्त वेळ तुमच्या पार्टनरसाठी राखून ठेवा. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधा. तुमचे यश-अपयश याबद्दल त्यांना सांगा. तसेच त्यांच्या मनात काय सुरु आहे, याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. पुरेसा वेळ दिल्याने या सर्व गोष्टी शक्य आहे.त्यामुळे तुमचा जास्तीत जास्त वेळ आपल्या पार्टनरसोबत घालवा.
अशाप्रकारे या काही गोष्टी आहेत ज्या स्त्रियांना पुरुषांकडून हव्या असतात.