एक महिला पुरुषावर कधीपर्यंत प्रेम करते….. स्त्रि पुरुषाला कधी कंटाळते…. नक्की बघा

Uncategorized

मित्रांनो, एखादी महिला एखाद्या पुरुषावर कधीपर्यंत प्रेम करू शकते. असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. आजच्या या लेखांमध्ये आपण स्त्री पुरुषाला कधी कंटाळा येतो. एक महिला पुरुषावर कधीपर्यंत प्रेम करते याबद्दलची माहिती पाहणार आहोत.

 

एका नगरात एक राजा राहत असे, त्याचे वय चाळीस वर्ष झालं होतं. चाळीस वर्षे वय असून सुद्धा त्याने अजूनही लग्न केले नव्हते. याचे कारण फक्त एकच होते, आणि ते म्हणजे त्याच्या आवडीची कुठलीच मुलगी त्याला अजून मिळाली नव्हती. एके दिवशी तो राजा जंगलात शिकारीसाठी गेला असता, तिथे त्याला एक झोपडी दिसली. ज्या झोपडीत एक खूपच सुंदर अशी वेश्या राहत असे. ती एवढी सुंदर होती की, तिला पाहून असंच वाटायचं की, स्वर्गातून जणू अप्सरा पृथ्वीवर अवतरली आहे. राजाने जस त्या स्त्रीला पाहिलं तसं तो,तिच्यावर मोहित झाला. आणि त्याच्या मनात तिच्याशी विवाह करण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ लागली. राजाला ती एक वेश्या आहे हे माहीत असून सुद्धा, तिच्याशी लग्न करायचं होतं. त्या स्त्रीची सुंदरता पाहून राजा पूर्णपणे, तिच्यावर घायाळ झाला होता. तो स्वतःला थांबवु शकत नव्हता, आणि त्या वेश्या जवळ पोहोचला. वेश्या जवळ जाऊन राजा तिला म्हणाला, मला तुझ्याशी लग्न करायच आहे. मी तुझ्या सुंदरतेवर पूर्णपणे मोहित होऊन गेलो आहे. आणि म्हणूनच तु माझ्यासोबत लग्न करावे, अशी माझी इच्छा आहे.

 

राजाच बोलणं ऐकून ती वेश्या म्हणू लागली, हे राजन तुम्ही मला चांगल्या प्रकारे ओळखता. तुम्हाला माहित आहे की, मी एक वेश्या आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा चांगलच माहीत असेल की, वेश्या कुठल्याही पुरुषासोबत प्रेम करत नाही अशा वेश्या स्त्रीचा कुठलाच धर्म नसतो. ती फक्त पैशावर प्रेम करत असते. तिच्यासाठी जिथे तिला जास्त पैसे मिळतील ती तिकडे जाणार. हे राजा साहेब तुम्हाला माहीत असेलच की, माझ्या आयुष्यात तुमच्या सारखे, असे कित्येक पुरुष आले आणि निघून गेले. त्यानंतर राजा म्हणाला, हे सुंदर स्त्री मला तुझ्या बोलण्याचा अर्थ अजून कळाला नाही. कृपया मला समजावून सांगावे, तेव्हा ती वेश्या म्हणाली, हे राजा साहेब, मी अजून पर्यंत लग्न केलेले नाही. मी कुमारिका आहे, आणि तरीसुद्धा मी एका विवाहितेचे जीवन जगत आहे. माझ्याजवळ रोज एक नवीन पुरुष येत असतो, आणि माझ्या शरीराला तो त्याच्या इच्छेचा शिकार बनवून, तिथून निघून जातो. कारण एक वेश्या असल्यामुळे हे सर्व मला करावच लागतं. हे महाराज, माझी आपणास विनंती आहे की, आपण पुन्हा आपल्या राज्यात निघून जावे. आणि माझ्यासोबत लग्न करण्याचा हट्ट तुम्ही सोडून द्यावा. कारण तुम्ही एक राजा आहात, आणि एक राजाने वेश्या सोबत लग्न केलं तर, त्याचा समाजात जनतेमध्ये खूप मोठा अपमान होईल. आणि हे अजिबात योग्य नाही. राजाची राणी म्हणून एक वेश्या शोभत नाही, तर राजाची राणी म्हणून एखाद्या राजाची राजकुमारी असली पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत, विवाह करण्याचा तुमचा हट्ट सोडून द्या.

 

वेश्याचे बोलणे ऐकून राजा तिला म्हणाला, मला माहित आहे की, तू एक वेश्या आहेस.आणि तरीही मी तुझ्या सुंदरतेवर पूर्णपणे मोहित झालो आहे. मी तुझ्यासोबत लग्न केल्याशिवाय पुन्हा घरी जाणार नाही. आणि म्हणूनच तू माझ्यासोबत लग्न कर. आणि माझी राणी बनून माझ्या राजदरबारात चल. राजाचा हा हट्ट पाहून ती वेश्या समजून गेली कि, राजा आता काही केल्या ऐकणार नाही. तो तिच्या सुंदरतेवर पूर्णपणे मोहित झाला आहे. त्यावेळेस वेश्याने राजाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु राजाने तिचं काही ऐकलं नाही. राजा त्याच्या मताशी ठाम राहिला. तेव्हा ती वेश्या म्हणाली ठीक आहे राजा साहेब. मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार आहे. मी तुमची राणी जरूर बनणार, परंतु तुम्हाला माझ्या दोन अटींची पूर्तता करावी लागेल. जर तुम्हाला माझ्या या दोन अटी मंजूर असतील तर सांगा. राजा बोलला तुझ्या दोन अटी कोणत्या आहेत ते सांग. तेव्हा वेश्या म्हणाली, हे राजा साहेब, माझ्या दोन अटी अशा प्रकारे आहेत. माझी पहिली अट अशी आहे की, माझ्याकडे दोन बकऱ्या आहेत, त्यांची तुम्हाला चांगल्या प्रकारे देखभाल करावी लागेल. त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागेल. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला मला चालणार नाही. आणि ज्या दिवशी माझ्या या दोन बकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल, त्याच दिवशी मी तुम्हाला सोडून निघून जाईल.

 

आणि दुसरी अशी आहे की, मी तुमच्या घरात जे काही करेल ते मला करू द्यायचं. तुम्ही मला बिलकुल थांबवायच नाही किंवा काहीही बोलायचं नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही मला थांबवण्याचा प्रयत्न कराल, त्याच दिवशी मी तुम्हाला सोडून पुन्हा निघून जाईल. मित्रांनो, राजा त्या वेश्येच्या सौंदर्यतेवर इतका मोहित झाला होता की, त्याने कोणताही विचार न करता त्या वेश्येच्या दोन्ही अटी मान्य केल्या. आणि म्हणाला, जस तुला हव आहे अगदी तसच होईल, परंतु तुम्हाला माझ्यासोबत लग्न करून आमच्या राजदरबारात यावं लागेन. कारण तुमच्या शिवाय मी आता जिवंत नाही राहु शकत. तुमच्यावर मी खूप जास्त प्रेम करू लागलो आहे. तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात मी आता पूर्णपणे अडकलो आहे. आणि म्हणूनच आता आणखी वेळ लागू नका, आणि लवकरच माझ्यासोबत लग्न करून राजदरबारात चला. ज्या काही आटी आहेत त्या सर्व आटी मला मान्य आहेत.राजाच हे बोलणे ऐकून ती वेश्या राजा सोबत लग्न करण्यास राजी होते. ही खरी गोष्ट आहे की, जेव्हा मनुष्याच्या डोक्यावर काम वासना चढलेली असते. तेव्हा तो कोणत्याही गोष्टीचा, कुठल्याही चालीरीतींचा विचार करत नाही. त्याला त्याच्या आयुष्यात दुसरे काहीच दिसत नाही. त्याला फक्त कामच दिसत असतं. आणि अशाच प्रकारे काहीशी राजाची अवस्था झाली होती.

 

राजा वेश्याला घेऊन राजदरबारात येतो, आणि तिथेच त्यांचा विवाह सोहळा संपन्न होतो. आता ती वेश्या राजासोबत त्याच राजदरबारात राहू लागते.परंतु राजाच्या राज्यातील जनतेला मात्र राजाचा हा निर्णय बिलकुल पटलेला नसतो. परंतु राजाला कोणी काही बोलू शकत नव्हता की, तुम्ही एका वेश्या सोबत लग्न का केले आहे. मित्रांनो, आता राजा वेश्या सोबत लग्न करून अगदी प्रेमाने आनंदाने त्या महालात राहू लागला. तो राजा आता त्याच्या राजदरबाराला सुद्धा विसरला होता. कारण तो त्या वेश्येच्या प्रेमात पूर्णपणे आंधळा झाला होता. तो चोवीस तास वेश्या सोबत असायचा. मित्रांनो, अशाच प्रकारे राजाच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली. मित्रांनो, एक दिवसाची गोष्ट आहे, राजाच्या राज्यात काही चोर चोरी करण्याच्या हेतूने आले. ते चोर राज्यात इकडेतिकडे फिरू लागले. त्यांना काही चोरी करण्यासाठी सापडत आहे का हे ते पाहू लागले. नंतर त्यांना समजलं की राजाच्या राजमहालात दोन बकऱ्या आहेत. ज्यांची राजा विशेष काळजी घेतो. त्यांना वाटले बकऱ्या काहीतरी खास आहेत. त्यांच्या मध्ये काहीतरी विशेष आहे. त्यामुळे त्या चोरांनी निर्णय घेतला की, आपण त्या दोन्ही बकऱ्या चोरायच्या. मित्रांनो, हाच विचार करुन ते चोर बकऱ्या चोरण्यासाठी राजमहालात पोहोचतात. आणि त्या बकऱ्यांना सोडवून, त्यांना घेऊन तिथून पळ काढतात.

 

दुसरीकडे तो राजा वेश्या सोबत झोपला होता. जेव्हा ते चोर बकऱ्यांना घेऊन चालले होते तेव्हा त्या बकऱ्या ओरडू लागल्या. त्यांचा आवाज त्या वेश्याच्या काना पर्यंत पोहोचला. तेव्हा वेश्याणे राजाला लगेच सांगितलं की, पहा आमच्या बाकर्याना कोणीतरी त्रास देत आहे. आमच्या बकऱ्यांना काहीतरी त्रास होत आहे. कृपया माझ्या बकऱ्या सुखरूप आहेत की नाही हे जाऊन पहा. मित्रांनो, राजा बकऱ्याना पाहण्यासाठी पोहोचणार, त्याच्या आधीच ते चोर बकऱ्या घेऊन तिथून पळून गेले होते. राजाने राजमहालात आणि आजूबाजूला सर्वत्र शोधले, परंतु त्याला त्या बकऱ्या कुठेच सापडल्या नाहीत. राजाने त्याच्या बायकोला सर्व हकीकत सांगितली की, मी त्या बकऱ्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु मला त्या बकऱ्या कुठेही सापडल्या नाहीत. कदाचित त्यांना कोणीतरी चोरून घेऊन गेल असेल.

 

तेव्हा ती वेश्या म्हणाली, मग महाराज आता मला सांगा मी काय करू. तेव्हा राजा म्हणतो मी माझं वचन पूर्ण करू शकलो नाही. मी तुझ्या त्या दोन अटी पूर्ण करण्याच तुला जे काही वचन दिलं होतं, ते वचन मी आता पूर्ण करू शकलो नाही. आता तुला काय वाटत असेल ते तू करू शकतेस. तुझा निर्णय घेण्यासाठी तू पूर्णपणे मोकळी आहेस. मित्रांनो, राजाच बोलणे ऐकून ती वेश्या राजाला म्हणते, मी माझ्या आटी नुसार तुम्हाला सोडून निघून जात आहे. मित्रांनो, ती वेश्या राजाला सोडून पुन्हा तिच्या झोपडीच्या दिशेने गेली. वेश्येला जाताना पाहून राजा काहीही न बोलता, तिच्याकडे पाहत होता. त्याने वचन दिल असल्यामुळे तो तिला थांबवू शकत नव्हता. राजांच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते, तो एकटक जाणाऱ्या त्या वेश्याकडे पाहत होता. परंतु ती वेश्या तिथून निघून जाते व तिच्या झोपडीत पोहोचते. मित्रांनो, आता ती वेश्या राजाला सोडून निघून गेली होती. आणि राजाच्या आयुष्यात आता निराशा आली होती.

 

राजा दिवस रात्र फक्त तिचाच विचार करायचा. तो दिवस रात्र त्याच्या बेडवर पडून असायचा, या कुशीवरून त्या कुशावर असा तो सारखा करत असे. त्याचे आता राजदरबारात सुद्धा लक्ष लागत नव्हते. त्याला फक्त ह्याच गोष्टीची खंत होती कि, मी माझ्या बायकोला थांबवू शकलो नाही. तो फक्त हाच विचार करायचा की, मी आता तिला परत कसा आणू शकतो. असेच काही दिवस राजाने त्याच्या बायको वीणा घालवले. राजा पूर्ण रात्र, पूर्ण दिवस त्याच्या अंथरुणावर असायचा. राजाचं सुख जैन पूर्णपणे निघून गेल होत. राजाला आता झोप सुद्धा लागत नव्हती. मित्रांनो, असेच काही दिवस झाल्यानंतर, जेव्हा राजाला त्याच्या बायकोची खूप जास्तच आठवण येऊ लागली. तेव्हा राजाने त्याचा घोडा काढला आणि पुन्हा त्या जंगलात जिथे ती वेश्या राहत होती, तिथे तिच्या झोपडीजवळ गेला. राजा त्या वेश्या जवळ जाऊन पोहोचतो, आणि तिला म्हणतो. हे सुंदरी तुम्ही माझ्या आता पत्नी आहात, आणि अटीमुळे तुम्ही मला सोडून इकडे निघून आला आहात.

 

आणि जेव्हापासून तुम्ही इकडे आला आहात, तेव्हापासून माझ्या आयुष्यात पूर्णपणे निराशा आली आहे. माझं सुख चैन कुठेतरी हरवल आहे. पूर्ण रात्र मी झोपू शकत नाही, या कुशीवरून त्या कुशीवर बदलून पूर्ण रात्र निघून जाते, मी तुझ्याविना नाही राहू शकत अजिबात नाही राहू शकत. तू काहीही कर पण माझ्यासोबत चल. कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मित्रांनो, राजाच बोलणे ऐकून वेश्या म्हणू लागली. हे राजा साहेब, मी काही दिवस तुमची पत्नी बनून तुमच्या राजमहालात राहिले. तुम्हाला हे चांगलच माहित आहे की, मी एक वेश्या आहे. आणि वेश्याचा कोणताच धर्म नसतो, वेश्याचे रोज नवीन पती असतात. प्रत्येक दिवशी तिची नवीन पुरुषासोबत ओळख होत असते. कारण वेश्याच कामच ते आहे की, तिच्या शरीराला विकायचं आणि मी ही माझं काम करते आहे. तुमच्यासारखे कामाचे पुजारी माझ्या जवळ येतात, आणि त्यांची इच्छा पूर्ण करून निघून जातात. मी एक वेश्या आहे, मी काही दिवस तुमच्या राजमहालात तुमची बायको बनून राहिले.

 

परंतु मी कायमची तुमच्या राजमहालात नाही राहु शकतं. तुम्ही तुमचं वचन पूर्ण करू शकला नाहीत, आणि म्हणूनच मी तुम्हाला सोडून इकडे परत आली आहे. आणि आता तुम्ही पून्हा हट्ट करू नका. तुम्ही तुमच्या राज्यात पुन्हा परत निघून जा. मित्रांनो, वेश्याच बोलणे ऐकून, राजा म्हणू लागला. नाही सुंदरी तुम्ही तर माझी पत्नी आहात. तुमच्या वीणा मी आता राहू शकत नाही, तुझ्या विना मी जगू शकत नाही. तेव्हा वेश्याने समजावलं की, राजा साहेब.तुम्ही माझ्या प्रेमात खूपच वेडे झाले आहात, हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही एक राजा आहात व राजाने एका वेश्या सोबत लग्न करणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या दरबारात परत निघून जा. परंतु जाण्यापूर्वी मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. कृपया लक्ष देऊन ऐका,माझी पहिली गोष्ट आहे राजा साहेब, तुम्ही जसं माझ्यावर एका वेश्येवर प्रेम करत आहात, ते तुम्हाला शोभत नाही.

 

एका राजाने एका वेश्या सोबत प्रेम करणं, विवाह करणे हे त्याला शोभत नाही. कारण तो राजा असतो आणि राजा जर वेश्येच्या प्रेमात वेडा झाला असेल तर, ते त्याला शोभत नाही. कारण वेश्याचा कोणताच धर्म नसतो, वेश्या माहित नाही आयुष्यात किती पाप करत असते. त्यामुळे तुम्ही माझं बोलणं व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही तुमच्या हट्टावर बसू नका. तुम्ही तुमच्या राजदरबारात परत निघून जा. माझी दुसरी गोष्ट ही आहे राजसाहेब. मी तर एक वेश्या आहे, वेष्याचा कोणताच धर्म नसतो. परंतु या समाजातील स्त्रियांचा धर्म असतो, त्यांचे काही रितीरिवाज असतात. आपले पौराणिक शास्त्रात, वेदशास्त्रात असे सांगतात की, आपल्या समाजातील ज्या स्त्रिया असतात. त्यांचा धर्म असतो की, त्यांनी त्यांच्या नवऱ्याची नेहमी साथ द्यावी.

 

नेहमी त्यांच्या सोबत रहाव. आपल्या नवऱ्याला त्यांनी परमेश्वर समजावं. नवरा कसाही असो, तो निर्भय असू दे, किंवा नसू दे, तो कंगाल असला, किंवा निर्जन असला, भिकारी असला, किंवा चोर जरी असला, काळा असला, किंवा गोरा असला. तरीही स्त्रीच हेच कर्तव्य आहे की, तिने तिच्या नवऱ्यालाच सर्व काही समजावं. आणि त्याची मनोभावे सेवा करावी. परंतु ही गोष्ट आमच्या सारख्या वेश्याला लागू होत नाही, कारण आमच्या सारख्या अशा स्त्रियांचा कोणता धर्म नाही, कोणतेच कर्तव्य नाही. आमच्या सारख्या स्त्रियांच्या जीवनात माहित नाही किती आम्ही पाप करत असतो. आणि म्हणूनच वेशा स्त्रीचा कोणता धर्म नसतो. आणि समाजातील स्त्रिया असतात त्यांच कर्तव्य असत की नवऱ्याची सेवा करावी.

 

त्याचप्रमाणे नवऱ्याच देखील हेच कर्तव्य आहे की, त्याची बायको कशी का असेना काळी असो किंवा गोरी असो, कशीही असू द्या नवऱ्याने सुद्धा पत्नी धर्माच पालन चिंतन करणे गरजेचे आहे. त्याने त्याच्या पत्नी पर्यंत सीमित राहायला पाहिजे.

 

त्याने दुसऱ्या स्त्रियांकडे चुकूनही जाऊ नये. हे गरजेचे नाही की फक्त पत्नीने पतिव्रता धर्माचे पालन करावे. तर नवऱ्याने सुद्धा पत्नी व्रता धर्माचे पालन अवश्य करावे. माझी तिसरी गोष्ट ही आहे राजासाहेब, ज्या स्त्रिया धनाच्या लोभापायी त्यांच्या नवऱ्याला सोडून जातात. तर अशा स्त्रीया आमच्यापेक्षा ही खालच्या दर्जाच्या असतात, कारण आम्ही तर वेश्या आहोत. आम्हाला जिथे अधिक धन मिळेल, आम्ही तिकडे जाणार. जिथे मला जास्त धन मिळत मी त्याची राणी बनते, मी त्याची तितक्या वेळेपुरती बायको बनते.

 

आणि त्यानंतर दुसऱ्या पुरुषाकडे मला जास्त धन मिळालं तर, मी पहिल्या पुरुषाला सोडून दुसऱ्या कडे जाते आणि त्याची राणी किंवा बायको बनते. आणि त्यामुळेच आमच्यासारख्या वेश्या स्त्रियांचा कोणताच धर्म नाही. परंतु समाजातील स्त्रियांचा धर्म आहे, त्यानी त्यांच्या नवऱ्याला सोडून जाऊ नये. पैसे कमी असतील, पती गरीब असेल.तर अशावेळी स्त्रीचा हा धर्म नाही की, तिच्या त्या गरीब नवऱ्याला सोडून एखाद्या श्रीमंत पर पुरुषाकडे जावे, हे त्या स्त्रीला बिलकूल शोभत नाही. आणि म्हणूनच स्त्रीचा हा धर्म आहे की, तिचा नवरा किती गरीब असुदे, निर्जन असुदे तरी त्याची साथ मरेपर्यंत द्यावी. आणि राजासाहेब, ज्या स्त्रिया परपुरुषाच्या धनाला पाहून त्यांच्या धनाकडे मोहित होऊन, स्वतःच्या नवऱ्याला सोडून देतात. तर अशा स्त्रियांना देव सुद्धा माफ करत नाही. आणि अशा स्त्रिया त्यांच्या आयुष्यात नेहमीच दुख सहन करतात. मरणानंतर सुद्धा अशा स्त्रियांना देवाच्या दरबारात माफी मिळत नाही.

 

एक गोष्ट तुम्हाला आणखी सांगते. राजा साहेब जी स्त्री तिच्या नवऱ्याला वेळोवेळी सांगत असते की, मी तुमच्यावर खूप जास्त प्रेम करते. जी स्त्री वेळोवेळी नवऱ्याला बोलत असते की, मी तुझ्यावर खूप प्रेम करते तर समजून जावे की, अशी श्री नक्कीच धोका देणार आहे. एकंदरीत सांगण्याचा उद्देश हा आहे की, पती-पत्नीचे एकमेकांवर प्रेम आहे, हे एकमेकांना गरजेपेक्षा जास्त वेळा सांगत असतील तर, ही सुद्धा धोकादायक गोष्ट आहे. आणि अशावेळी दोघांपैकी कोणीतरी एक, जास्त वेळासाठी थांबू शकत नाही. त्या दोघांपैकी कोणीतरी एकमेकांना सोडून नक्कीच निघून जातो. एक तर नवरा बायकोला सोडून जातो किंवा बायको नवऱ्याला सोडून जाते. तर राजासाहेब याच काही गोष्टी होत्या, ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या. तुम्ही माझ्या सारख्या एका वेश्येच्या प्रेमात अडकू नका. तुम्ही तुमच्या राजदरबारात, राज्यात परत निघून जा. .

 

आणि एखादी चांगली राजकुमारी पाहून, तिच्या सोबत लग्न करा. ज्यामुळे तुमच्या प्रजेला तुम्ही त्यांचे राजा आहात, याच गर्व वाटेल. मित्रांनो, त्या वेश्याच ते बोलणे ऐकून राजाला समजत की, मी एका चुकीच्या मार्गावर चाललो आहे. त्यानंतर राजा त्या वेश्या जवळ माफी मागतो. आणि त्यानंतर राजा पुन्हा त्याच्या राजमहालात परत येतो. त्यानंतर एक सुंदर राजकुमारी पाहून, तिच्या सोबत विवाह करतो. आणि त्यानंतर त्याच्या राज्यात तो आनंदाने तिच्या सोबत राहू लागतो.

 

अशाप्रकारे ही एक सुंदर कथा आहे. ज्यातून आपल्याला एखादी स्त्री एखादा पुरुषांवर कधीपर्यंत प्रेम करू शकता याची माहिती कळते.

Leave a Reply

Your email address will not be published.