मित्रांनो, खबरदारी घेऊनही घरात एखादा उंदीर शिरला तर त्याला घरातून बाहेर काढणं म्हणजे फार जिकिरीचं काम. तो घरातल्या किती वस्तूंचं नुकसान करेल, याचा काहीच अंदाज नाही. अशा वेळी उंदरांना न मारता त्यांना घरातून पळवायचं कसं, याचे अगदी सोपे घरगुती उपाय आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
घराची कितीही स्वच्छता केली तरीही आसपास उंदरांचा सुळसुळाट असेल तर त्यातलाच एखादा तुमच्याही घरात आल्याशिवाय राहणार नाही. स्वयंपाकघरातल्या वस्तूंच्या नुकसाना बरोबरच घरात असणारं सामान उंदरांना कुरतडायला कमी पडेल इतका त्यांचा त्रास वाढू शकतो. महत्त्वाची कागदपत्रं कुरतडणं, कपडे कुरतडणं असे अनेक प्रकार घडतात. अनेकांना घरातला उंदीर मारणंसुद्धा योग्य वाटत नाही; पण त्याला घराबाहेर काढणंसुद्धा तितकंच कठीण असतं.
घरातल्या सामानाचं होणारं नुकसान टाळणं आणि त्याला न मारणं यासाठी अनेक जण पर्याय शोधत असतात. घरातला उंदीर पळवण्यासाठी बाजारात वेगवेगळे पर्याय दिसतील. यातलं रॅट किलर म्हणून एखादं औषध आणलं तर त्यानं उंदीर मरेल; पण तो घरातल्या अशा एखाद्या कोपऱ्यात मरून पडेल की आपल्याला समजायला दिवस जाईल आणि तो सापडल्यावर उचलून टाकणं हे काम फारच शिसारी आणणारं असतं. त्यापेक्षा एखाद्या घरगुती उपायानंच तो घरातून पळवता आला तर जास्त उत्तम. उंदराला न मारता घराबाहेर काढण्यासाठीचे उपाय जाणून घेऊया.
त्यातील पहिला उपाय म्हणजे पेपरमिंट. घराच्या ज्या भागात उंदीर फिरतात तिथं एका कापसात पेपरमिंट लावून ठेवून द्या. उंदीर आपोआप घर सोडून पळून जातील. कारण या वासामुळे घरात उंदीर राहत नाहीत हा वास उंदरांना आवडत नाही.
दुसरा उपाय म्हणजे तंबाखू. उंदरांना घराबाहेर काढण्यासाठी तंबाखू हा एक उपाय आहे. त्यातल्या नशा निर्माण करणाऱ्या घटकांच्या वासामुळे उंदीर त्रस्त होऊन घरातून पळून जातात. त्यासाठी आपल्याला थोडेसे तंबाखू घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या घरात असणारे तूप घालायचे आहे व थोडेसे बेसन घालून याची गोळी तयार करायची आहे. आणि ही गोळी ज्या ठिकाणी उंदरांची वर्दळ जास्त असेल त्या ठिकाणी ठेवायचे आहे. त्यामुळे घरातील उंदीर पळून जातील.
तिसरा उपाय म्हणजे लाल तिखट. लाल तिखटाचा उपयोगही उंदरांना घराबाहेर काढण्यासाठी करता येईल. घरातल्या ज्या भागात उंदीर वारंवार येतात, तिथं लाल तिखट टाकून ठेवा. एखाद्या पिठात मिसळून त्याचे गोळे टाकून ठेवा. या उपायाने देखील आपल्या घरातील उंदीर पळून जातील.
चौथा उपाय म्हणजे तमालपत्र. तमालपत्र हे एक सुगंधी पान आहे जे सामान्यतः चवदार पाक कृतींसाठी वापरले जाते. संपूर्ण बे पानांना तीक्ष्ण, कडू चव असते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तमालपत्राचा सुगंध तुम्हाला तुमच्या घरातून उंदीर आणि उंदीर दूर करण्यास मदत करू शकतो. तमालपत्रातील हर्बल, किंचित फुलोरा सुगंध उंदीरांना आकर्षित करेल. उंदीर विचार करतील की त्यांच्यासाठी अन्न स्रोत आहे. जेव्हा ते तमालपत्र अन्न म्हणून खातात तेव्हा ते स्वतःला गुदमरतात आणि नंतर मरतात.
पाचवा उपाय म्हणजे माणसांचे केस. उंदरांना घराबाहेर काढण्याचा सर्वात सोप्पा उपाय आहे मानवाचे केस. तुम्हाला आश्चर्य वाटेल उंदीर पळवण्याचा सर्वात सोप्पा उपाय आहे कारण माणसाच्या केसांमुळे उंदीर पळून जातात. कारण त्यांना काढल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो यामुळे हे जवळ आल्यास ते घाबरतात.
सहावा उपाय म्हणजे तुरटी. जी तुरटी आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो त्या तुरटीचा वापर करून आपण आपल्या घरातील उंदीर पळवून लावू शकतो. यासाठी आपल्याला थोडीशी तुरटी घ्यायची आहे आणि ती एका पानाच्या बॉटलमध्ये घालून चांगला प्रकारे विरघळून घ्यायचे आहे. आणि हा विरघळलेला पाण्याचा स्प्रे ज्या ठिकाणी उंदीर जास्त दरवळत असतील त्या ठिकाणी मारायचा आहे. यामुळे देखील उंदीर पळून जातात.
सातवा उपाय म्हणजे पुदिना.पुदिन्याच्या तीव्र वासाने उंदर घरात राहत नाहीत. पुदिन्याची पानं बारीक करून घराच्या कोपऱ्यात आणि दरवाज्याजवळ ठेवा किंवा पुदिन्याते तेल एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घरात शिंपडा. ज्यामुळे उंदरांच्या त्रासापासून आराम मिळेल.
आणि शेवटचा उपाय म्हणजे आपल्याला एक उंदीर पकडण्याचे जाळे घ्यायचे आहे आणि त्या जाळ्यामध्ये काही तेलकट पदार्थ ठेवायचे आहेत. ज्यामुळे उंदीर त्याच्याकडे आकर्षित होऊन त्या जाळ्यात फसतील. उंदीर त्या जाळ्यामध्ये पकडल्यानंतर आपल्याला रंगपंचमीचे वेगवेगळे रंग घ्यायचे आहेत आणि ते थोड्याशा पानांमध्ये घालून त्यांचे वेगवेगळे प्रकारचे मिश्रण तयार करायचे आहेत.
आता हे पाणी वेगवेगळ्या रंगाचे झालेले असेल. त्यानंतर आपल्याला एक इंजेक्शनची सिरीज घ्यायचे आहे आणि त्या सिरीज मध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे पाणी घेऊन त्या उंदरांवर मारायचे आहे. ज्यामुळे उंदीर वेगवेगळ्या रंगाचा तयार होईल. आता हा तयार झालेला उंदीर बाहेर सोडायचा आहे. ज्यामुळे तो विचित्र दिसेल आणि त्याचा सोबत असलेले अनेक उंदीर या उंदरामुळे घरातून पळून जातील.
अशाप्रकारे हे उंदीर घरातून पळून लावण्याचे काही घरगुती उपाय आहेत.