मित्रांनो प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते आणि त्यांच्या कुळानुसार ही कुलदेवी ठरवले जाते आणि कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये खूप मोठा आशीर्वाद असतो बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरात येत नाही आणि या देवीला आपण कुलदेवी असे म्हणतो पिढ्यानपिढ्या आपल्या घरामध्ये कुलदेवीची ही सेवा केली जाते.
ज्याप्रकारे की आई तुळजाभवानी आई मोहटादेवी आई काळुबाई आई रेणुका माता आई सप्तशृंगी तर मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये हे त्यांच्या कुळानुसार कुलदेवी बदलत असते मित्रांनो ज्या प्रकारे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करत असते शेवटच्या श्वासापर्यंत त्याचे रक्षण करते त्या मुलाचं त्याप्रमाणेच त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचं त्या घराण्याचं रक्षण करत असते
कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कोणती अशी गोष्ट करायची आहे. कठोर तपश्चर्या करायला लागत नाही देवी माता ही फक्त भक्तीची भुकेली असते कुलदेवी ही स्वतःच स्वयंभू असते. पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातील व्यक्ती ही सेवा करत असतात आणि जरी एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल त्या घरामध्ये वादविवाद होत असतात हे सुद्धा एक पहिलं लक्षण आहे त्या घरामध्ये अजिबात शांतता नसते प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणी येत असतात.
अशा अनेक समस्या घरामध्ये येत असतात तर मित्रांनो साध्या सेवेने कुलदेवी प्रसन्न होते जेव्हा आपल्या कुलदेवीचा वार असतो आणि त्या दिवशी तुम्हाला आवर्जून सेवा करायची आहे देवीची मनापासून पूजा करायचे आहे दिवा लावायचा आहे देवीच्या पुढे भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या मातेचे देवीचं नामस्मरण तुम्हाला करायचा आहे .
आपल्या घरामध्ये जी वडीलधारी माणसं राहतात आजी आजोबा आपल्या कुटुंबाची देखभाल करत असतात अशाच प्रकारे कुलदेवी तुमचा सांभाळ करत असते वर्षातून एकदा तरी आपल्याला आवर्जून कुलदेवीला जायचं आहे जे मूळ ठिकाण आहे त्या ठिकाणी जायचं आहे घरातील जेष्ठ व्यक्ती आपली लहान मुलं बाळ घेऊन जायचे आहे.
देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे नतमस्तक व्हायचं आहे व देवीची ओटी भरायची आहे मनापासून प्रार्थना करायचे आहे असं केल्यावर नेहमी तुमच्या घरावर देवीचा आशीर्वाद राहील देवीची नेहमी सावली आपल्याबरोबर असते महाराष्ट्राच्या देशाच्या कुठे ही रहा कुलदेवीची शक्ती तुमच्याबरोबर रक्षण करणार नेहमी असणार आहे.
तुमच्यावर कितीही वाईट प्रसंग आला तर देवी तुम्हाला त्यातून वाचवणार आहे. देवीच्या समोर मंगल कलश ठेवायचा आहे. आपल्या घरामध्ये जेव्हा जेव्हा मंगल कार्य होतं त्यावेळेस आपल्याला आपल्या कुलदेवीला विसरायचं नाही म्हणजेच की घरामध्ये लग्न असू दे गाडी घेतलेले असू दे. घर घेतलेला असू दे या कोणत्याही मंगलप्रसंगी आपल्या कुलदेवीला विसरायचे नाही.
सर्वात अगोदर तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मगच पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे जसं की तुमचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा असेल तर तुम्हाला जेजुरीला एकदा तरी जायचं आहे आणि भंडारा आकाशामध्ये उधळून द्यायचा आहे येळकोट येळकोट जय मल्हार म्हणा आणि वाऱ्यासारखे संकटे दूर होतील मित्रांनो अशी काही लक्षणे देखील असतात .
की त्यावरून समजते की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे कुलदेवीचा वास तुमच्या घरामध्ये आहे ज्या घरातील कुलदेवी त्या घरातील व्यक्तींवर खुश असते त्या घरात कोणत्याच कामांमध्ये बांधा येत नाही म्हणजेच की त्या घरातील कोणत्याही व्यक्तीने एखादं काम जरी हाती घेतलं तर ते पूर्ण होतात.
मित्रांनो ज्या व्यक्तीच्या घरामध्ये सतत कामांमध्ये अडचणी येत असतात कितीही साधं काम असलं तरी अनेक अडचणी निर्माण होतात. यावरून तुम्हाला समजून जायचे आहे की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून काहीतरी चुकत आहे यामुळे तुम्हाला वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या ठिकाणी जायचं आहे.