मित्रांनो, वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार असे म्हटले जाते की, श्रीमंती येण्याआधी म्हणजेच समृद्धी येण्याआधी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होण्याआधी निसर्ग आपल्याला काही संकेत देत असतात. या संकेतांना आपण इग्नोर करू नका. हे शुभ संकेत दर्शवतात की आपल्या जीवनात काहीतरी मोठे आणि आनंददायी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच आपल्या घराला भेट देणार आहे.
हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी देवीला धनाची देवी म्हणतात. ज्या कोणावर माता लक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीला कधीही पैशाची तंगी भासत नाही. त्याला कोणताही परिस्थितीमध्ये पैशाची कमतरता भासत नाही. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक आपल्या घरी कोणते ना कोणते उपाय करत राहतात. अशी मान्यता आहे की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा होते त्या घरात काही शुभ संकेत मिळतात. तर मग ते कोणते शुभ संकेत आहे याचीच माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
1. हाताला खाज सुटणे. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगले चिन्ह मानले जाते. याचा अर्थ असा की पैशाची संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.
2. शंखध्वनी ऐकू येणे. सकाळी उठल्या उठल्या जर शंका चा आवाज ऐकू आला तर तो जीवनात चांगल्या बदलाचे संकेत मानले जातो. आपल्या वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे. तसेच जीवनात काही मोठी उपलब्ध मिळू शकते.
3. कळ्या मुंग्या. जर घरात अचानक काळया मुंग्या एका ओळींमध्ये दिसल्या आणि त्या खाद्यपदार्थावर तुटून पडण्यास सुरुवात केली तर समजून जा की माता लक्ष्मीची आगमन आपल्या घरात झाले आहे. हे घरात येणाऱ्या पैशाचे संकेत देखील असू शकते.
4. गाईचे हंबरणे. जर एखादी गाया तुला दारा देऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद मांडला पाहिजे. आणि चपाती किंवा पालक खायला घालून गायला पाठवावे. याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः आपल्या दारात येऊन दार ठोठावले आहे.
5. तुळस भरणे. जर आपल्या दारातील तुळस अचानक हिरवी घनदाट होऊन बहरले असेल तर असे म्हणावे आपल्या घरात धन आणि समृद्धी लवकर येणार आहे.
6. नारळ. सकाळी उठतात जर पूजेचा नारळाचे दर्शन झाले तर याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे.
7. पैसे सापडणे. जर आपल्याला सकाळी घराबाहेर पडताना पैसे सापडले तर हे पैसे येण्याच्या आगमनाची संकेत आहेत. लवकरच तुम्हाला पैसे मिळतील. दुसरीकडे कपडे परिधान करताना किंवा काढताना खिशातून पैसे पडले तर ते धन प्राप्तीचे संकेत आहेत. 8. झाडू दिसणे. शास्त्रानुसार झाडू आणि माता लक्ष्मी यांचे अतूट संबंध आहेत. अशा परिस्थितीत जर आपल्याला सकाळी एखादा झाडू मारताना पाहिले तर आपल्याला लवकरच श्रीमंत व्हाल. सकाळी घरातून ऑफिसला जात असताना सतत पाच दिवस कोणतेही कोणीही झाडू मारताना दिसेल तर समजून जा की आता आपली सर्व दुःख दूर होणार माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे.
9.मांजरीचे पिल्लांना जन्म देणे. देखील खूप शुभ संकेत आहे. जर मांजर आपल्या घरातील यांना जन्म देत असेल तर तो एक शुभ संकेत मानावा. दुसरीकडे छतावर एखादी मौल्यवान वस्तू पडणे हे देखील चांगले मांडले जाते. शास्त्रानुसार एखादा पक्षी आपला छतावर काही मौलवान वस्तू पाडून जात असेल तर हा देखील श्रीमंत होण्याचा एक संकेत मानला जातो.
10. पाल दिसणे. घरात अचानक एकाच ठिकाणी तीन पाली दिसला तर तो खूप शुभ संकेत मानला जातो. महालक्ष्मीच्या आगमनाचे हे संकेत आहे. असे म्हटले जाते की, जर पाल एकमेकांच्या पाठलाग करताना दिसल्या तर ते घराच्या प्रगतीचे संकेत आहेत. दीपावलीतील तुळशीमध्ये पाल दिसणे खूपच शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळण्याचे संकेत आहे. 11. सकाळ सकाळी ऊस पाहणे. देखील खूप शुभ मानले जाते. जर आपण सकाळी आपल्या सभोवताली अचानक ऊस पाहिले तर स्पष्ट संकेत आहे की आपले चांगले दिवस येणार आहेत.
12. माता लक्ष्मीचे वाहन घुबड. बराच काळापासून आपल्याला घराबाहेर दिसत असेल तर समजा माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. माता लक्ष्मी नक्की तिथे जाते आणि तुम्हाला लवकर संपत्ती मिळेल.
13.स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले पाहणे. हे संपत्तीचे संकेत मानले जाते. स्वप्नात एक मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते. हे संपत्ती आणि अध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे.
14. स्वप्नात लाल साडी मध्ये स्त्री पाहणे. हे देवी लक्ष्मीची संकेत मानले जाते. स्वप्नात उंचावर चढणे ही प्रगती आणि यशाची लक्षणे मांडले जाते.
15. जर तुम्ही कुठेतरी कामाला जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा आपल्याला तोंडात शाहकारी वस्तू किंवा भाकरी आणत असेल तर हे सूचित करते की तुम्हाला कुठेतरी पैसे मिळतील.
16. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा तुमची झोप ब्रह्म मुहूर्त मध्ये उघडण्यास सुरुवात होते. आपली दिनचर्या सुधारण्यास सुरुवात होते आणि हळूहळू सर्व अडचणी अदृश्य होऊ लागतात. शास्त्र वचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की जर तुमची झोप पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान उघडली तर दुःखाचे ढग तुमच्या आयुष्यापासून दूर जाऊ लागतात आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावर कुटुंबावर सुरू होते.
17. जर आपण स्वप्नात एखादा पोप पाहिला तर आपण त्या शुभ संकेत मानावा. स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा आहे की आपला आर्थिक समस्या लवकर दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार आहे. आपल्या कुठून तरी आपल्याला कुठून तरी पैसे मिळणार आहेत.
18. आपण स्वप्नात कधी झाडू,घुबड, हत्ती, मोर, शंख, केळी किंवा पाल पाहिली तर समजा की आपले धनवान होण्याचे स्वप्न लवकर पूर्ण होईल.
19. शुभ कामसाठी जात असताना किन्नर दिसेल ते देखील शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत जर आपण किन्नर पहिला तर त्याला काही पैसे द्या. जर किन्नर आपल्यातला काही पैसे परत देत असेल तर ते ठेवावे. यामुळे धनात वाढ होते.
20. घराच्या छतावर कोकिळेचे बोलणे देखील एक शुभ संकेत आहेत. जर असे झाले तर आपल्या धनात वाढ होऊ शकते.
21. जर आपला स्वप्नामध्ये फळांनी भरलेले वृक्ष दिसले तर हे ते आपल्या जीवनात खूप आनंद दर्शवते फळ आणि फुल आनंदाने प्रत्येक मानले जाते. फळाने भरलेले झाड आनंदाच्या आगमनाचे लक्षण मानले जाते. स्वप्नामध्ये मुंगूस दिसणे शुभ मानले जाते धार्मिक शास्त्र वाचनानुसार आणि पौराणिक पुरानुसार मुंगूस दिसणे म्हणजे आपले आर्थिक बाजू बळकट होणे.
अशाप्रकारे हे 21 लक्षणे आहेत जे श्रीमंती होण्याआधी आपल्याला मिळत असतात.