जेव्हा देव परीक्षा घेतात तेव्हा तुमच्या सोबत हे घडायला लागते?

Uncategorized

मित्रांनो, आपल्या आयुष्याचा शेवट हा आपल्याला सांगून येत नाही. हा शेवट देवाच्या हातामध्ये असतो. आपल्या भारतीय परंपरानुसार आपण कोणाच्याही घरामध्ये पाहुणे म्हणून गेलो तर त्यांच्यासाठी काही ना काही पदार्थ हे घेऊन जातो. परंतु जर आपला मरण आले तर आपला सोबत आपण काही घेऊ जात नाही. म्हणून जर आपला देवाकडे येताना काही ना काही घेऊन जायचं असेल तर आपला आयुष्यामध्ये सत्कर्म करणे खूप गरजेचे आहे. ज्याने आपण ते आपला सोबत घेऊन जातो. अशाच काही चांगल्या विचारांची शिदोरी आजचा लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

सत्यानं मिळतं तेच आयुष्यभर टिकत असतं..!

एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि संस्कार ठरवत असतो..!

वेळ काढून वेळ त्यालाच द्या ज्याला त्याची जाणीव असेल..!

प्रेम जर हृदयापासून असेल तर मन कधीच भरत नसतं..!

दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक या प्रकारचं दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढं मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ हे भोगावं लागत असतं, कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आहे आणि हाच कर्म सिद्धांत आहे..!

अति हुशार माणसं ही मनात कमी आणि डोक्यात जास्त राहत असतात..!

 

 

आयुष्यात कधी कधी नकोसा वाटणारा प्रवास इच्छे विरुद्ध असला, तरी पार करावाच लागतो, त्रास होतो फडफड होते, आत्मविश्वास खचतो, पण नेहमी लक्षात ठेवायचं हाच प्रवास तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणारा असतो..!

स्वतःच्या यशापर्यंत पोहोचण्याचा नकाशा बनवायचा असेल, तर अपयश हाती आलेल्या सगळ्या जागा लिहून ठेवत चला..!

 

 

परिस्थिती ही ओढातानीची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही कमी पडत नसतं..!

जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो कधीही विसरत नसतो, नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून चे सांभाळं जातं, ते खरं नातं असतं, जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो, असं नाही, हृदयापासून जो आपल्याला जवळचा मानतो, तोच आपला असतो..!

प्रत्येकाच्या खानदान मध्ये असा एक व्यक्ती असतोच जो भांडण लावून नंतर म्हणतो, माझा हेतू हा नव्हताच माझी तर इच्छा आहे की सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं..!

स्वतःचा विचार करणारा प्रगती करतो पण सर्वांच हित पाहणारा इतिहास घडवतो..!

 

दुःख तीच लोकं देतात, ज्यांच्याकडून आपल्याला सुखाची अपेक्षा नेहमी असते..!

प्रेम कधी पैसा किवा चेहरा बघून होत नसतं फक्त पुढच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्यासाठी किती आदर आहे आणि काळजी आहे, हे बघूनच होत असतं..!

ऐकून घेतलं.. की लोकं त्यांच्या बोलण्याच्या मर्यादा या विसरून जात असतात..!

 

संकटाचा काळ हा ठरलेला असतो, तो कधीच कुणाकडं मुक्कामाला नसतो, दिवस बदलत असतात..!

काही नाती ही भाड्याच्या घरासारखी असतात, त्याची कितीही सजावट करा, ती आपली कधीच होत नाहीत..!

ज्याला समजतं, त्याला सांगायचं ज्याला नाही समजत, त्याला टाळायचं..!

स्वतःला त्रास करून घेणारे हे प्रामाणिक लोकं असतात, स्वार्थी लोकांच्या अंगी निर्लजता असते..!

मनात काय आहे, ते स्पष्ट बोलावं न बोलता अंतर निर्माण होण्यापेक्षा बोलून निर्णय घेणं, हे कधीही चांगलं असतं..!

 

शोधून प्रेम करणारा सापडत नसतो नशिबात असेल, तर देव त्यांना समोर घेऊन येत असतो..!

दुःख विसरण्यासाठी आपल्या हक्काच्या व्यक्तीच्या खांदा आणि एक मिठी पुरेशी असते..!

इच्छा अपेक्षा या मर्यादित असल्या की स्वाभिमान शिकण्याची वेळ ही कधीच येत नसते..!

आशा दोन अक्षरांचा शब्द पण पूर्ण जग या शब्दावर अवलंबून आहे..!

 

खरं बोला फार फार तर समोरच्याला राग येईल तुमचा.. पण खोटं नका बोलू यामुळे समोरच्याच्या मनात असलेली तुमची चांगली प्रतिमा ही खराब होईल आणि राग हा काही काळासाठी असतो, तो जाईलही निघून पण एकदा तुमची प्रतिमा समोरच्या मनातून ही खराब झाली, तर ती आयुष्यभर तशीच राहत असते..!

 

अशाप्रकारे हे काही चांगले विचार आहेत. ज्याच्यामुळे आपले मन अत्यंत शुद्ध होते.

Leave a Reply

Your email address will not be published.