जी स्त्री अंघोळ न करता जेवण बनवते तिच्यासोबत पहा काय घडते…..!!

Uncategorized

मित्रांनो, स्वयंपाक घर हा आपल्या घरातील सर्वात महत्त्वपूर्ण घटक मानला जातो, कारण इथे देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीचा वास असतो. तुम्ही सुद्धा घरातील वडीलधाऱ्या माणसांकडून असे ऐकले असेलच की, स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे आणि नेहमी आंघोळ केल्यानंतरच जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक घरात जावे. तुम्हाला माहित आहे का ? की जे लोक आंघोळ करायच्या आधी, स्वयंपाक घरात जेवण बनवतात त्यांना कोणते पाप लागते ? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

वास्तुशास्त्राच्या अनुसार तुम्ही कोणत्या दिशेला तोंड करून जेवण बनवता आणि जेवता हे खूप महत्त्वाचे आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या अवस्थेत स्वयंपाक घरात प्रवेश करता. आंघोळ करण्याआधी तुम्ही कधीच स्वयंपाक करत जाऊ नये किंवा जेवण बनवू नये. आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये आंघोळ करण्याआधी भोजन ग्रहण करणे, पूर्णपणे निशिद्ध आहे. शास्त्रांच्या अनुसार जे लोक असे करतात ते देवी अन्नपूर्णाचा अपमान करतात. विज्ञान देखील असे मानते की, जो माणूस अंघोळ न करता जेवण बनवतो किंवा जेवण ग्रहण करतो, तो अनेक रोगांनी ग्रस्त होतो.

 

ज्या स्त्रिया आंघोळ न करता जेवण बनवतात त्यांच्या घरात नेहमी दुःखी आणि नकारात्मक वातावरण दिसून येते. स्त्रियांनी आंघोळ न करता फक्त जेवणच बनवु नये तर, धार्मिक शास्त्रांमध्ये अशी अनेक कामे सांगितले आहेत जी अंघोळ न करता करू नयेत. पुराणांच्या अनुसार ज्या स्त्रिया आंघोळ न करता देवाची पूजा करतात त्यांना पूजेचे फळ प्राप्त होत नाही.त्याचप्रमाणे कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर आचमन न करता केलेली पूजा देव कधीच स्वीकारत नाही. वैज्ञानिकांच्या मते स्नान केल्याने शरीराच्या सर्व अवयवांना आणि मनाला नवजीवन मिळते.

 

शरीरातील सर्व प्रकारचा मळ निघून जातो आणि शरीर स्वच्छ होते. शरीरामध्ये स्फूर्ती येते यामुळेच आपल्याला भूक लागते. अशावेळी ग्रहण केलेले अन्न शरीरासाठी खूप पौष्टिक असते. जर आपण आंघोळीच्या आधी अन्नग्रहण केले तर आपला जठराग्नि ते अन्न पचवण्याच्या कार्यात व्यस्त होतो. जे लोक दक्षिण दिशेला तोंड करून अन्नग्रहण करतात ते कधीच निरोगी राहू शकत नाही. तसेच पश्चिम दिशेकडे तोंड करून जेवण बनवले तर त्वचा आणि हाडांचा संबंधित रोग होण्याचा धोका असतो.

 

जर स्वयंपाक घराचा दरवाजा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल तरी देखील घरात चांगले वातावरण कधीच राहू शकत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवरून कुटुंबातील व्यक्तींमध्ये वाद होतात. त्याचप्रमाणे उत्तर दिशेला तोंड करूनही जेवण बनवू नये कारण यामुळे घराचे आर्थिक स्थिती बिघडते, जर पूर्व दिशेला तोंड करून जेवण बनवले तर ते घरासाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी खूप शुभ असते. गरुड पुराणामध्ये असा उल्लेख मिळतो की, काही लोकांच्या घरी कधीच अन्नग्रहण करू नये ज्याप्रमाणे एक म्हण आहे “जसे खाशील अन्न तसेच होईल मन” म्हणजेच माणूस ज्या प्रकारचे अन्नग्रहण करतो त्याचे मन सुद्धा तसेच बनते.

 

असेही काही लोक जगात असतात ज्यांच्या घरी अन्नग्रहण केल्यामुळे तुम्ही नकळत पापात भागीदारी करता पुराणानुसार जो माणूस दुसऱ्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन व्याजाने पैसे वसूल करतो त्याच्या घरात कधीच अन्नग्रहण करू नये. कारण चुकीच्या मार्गाने कमावलेले धनाचे परिणाम सुद्धा नेहमी अशुभच असतात.शास्त्रानुसार ज्या स्त्रिया स्वतःच्या मर्जीने वाईट कामे करतात किंवा चुकीच्या मार्गावर चालतात. त्यांच्या घरात सुद्धा अन्नग्रहण करू नये अशा महिलेच्या घरी अन्न केल्यामुळे मनावर वाईट परिणाम होतात आणि त्याचमुळे तुमच्या पुण्यकर्मांचे फळ तुम्हाला मिळत नाही.

 

एवढेच नव्हे तर जो माणूस महामारी किंवा अन्य कुठल्याही गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर त्याच्या घरी सुद्धा अन्नग्रहण करू नये, कारण आजारी असल्याने त्याच्या घरात अनेक प्रकारचे विषाणू असतात आणि ह्या विषाणूंचे तुम्ही सुद्धा शिकार बनू शकता. गरुड पुराणानुसार तृतीपंथीयांच्या घरी सुद्धा अन्नग्रहण करण्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे कारण या लोकांना नेहमी त्यांच्या क्षमतेप्रमाणेच दान मिळत असते. यांना मिळणारे दान हे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या लोकांकडून मिळत असते. जो माणूस चहाडी करतो त्याच्या घरी सुद्धा चुकूनही अन्नग्रहण करू नये.

 

कारण कोणाच्याही बाबतीत विनाकारण चांगले किंवा वाईट बोलणे हे पाप असते असे करणाऱ्या व्यक्तीला नेहमी त्रास सहन करावा लागतो. जो माणूस दुसऱ्यांची वाईट परिस्थिती पाहून खुश होतो अशा व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नये पुराणांच्या नुसार असे सांगितले आहे की, व्यसन करणारे लोक आणि अमली पदार्थ विकणारे लोक अशा लोकांच्या घरात अन्न कधीही खाऊ नये. अमली पदार्थांचे व्यसन नेहमी कुटुंब उध्वस्त करते आणि अशा लोकांच्या घरी अन्नग्रहण करणारे लोक पापांचे भागीदार होतात म्हणूनच अशा लोकांच्या घरापासून नेहमी दूर राहावे.

 

अशाप्रकारे जी स्त्री अंघोळ न करता जेवण बनवते तिच्यासोबत पहा काय घडते याची माहिती आज आपण जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.