मित्रांनो, आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी. प्रत्येक घर हे धन धान्यांनी प्रसन्न राहावे. कोणताही प्रकारचा आर्थिक अडचण उद्भवू नये. असे सर्वांनाच वाटत असते. त्यासाठी आपल्याला असं वाटते की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे स्थान हे कायम असायला हवे. दिवाळीच्या दिवसांमध्ये असे म्हटले जाते की लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाज्याच्या वरून जात असते.
ज्या दरवाजाजवळ कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही, दरवाजासमोर चामड्याच्या वस्तू पडलेल्या आहेत, झाडू पडलेला आहे अशा घरांमध्ये लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. म्हणून आपला आसपासचा परिसर हा स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर ज्या घरांमध्ये भांडणे वाद-विवाद नाही अशा घरांमध्येच लक्ष्मी सदैव वास करत असते. लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश केली आहे असे काही संकेत आपल्याला आपल्या घराचा अवतीभवती दिसणाऱ्या जीवांमुळे दिसत असतात ते जीव कोणते याबद्दलचीच माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या आजूबाजूला असं काही जीव आहेत ज्यांना लक्ष्मी स्वरूप मानले जाते व पूजनीय देखील मानले जाते. अशा जीवांचे दिसणे आपल्यासाठी अत्यंत फलंदाई सोबत घटना घडण्याचे संकेत मानले जातात. दिवाळीच्या दिवसांमध्ये जर तुमच्या घराचा आसपास किंवा घरांमध्ये सतत हे जीव दिसत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश केलेले आहे व येणारा काळ हा अत्यंत सुखद जाणार आहे. असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनच असं कोणकोणते जीव आहे जे आपल्याला दिसणे अत्यंत शुभ मानले जाते? याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
त्यातील पहिला जीव आहे फुलपाखरू. फुलपाखरू जितके दिसायला सुंदर असते तितके आपला घरांमध्ये भविष्यात होणाऱ्या सुखद घटना जास्त प्रमाणात असतात. फुलपाखरू मुळे आपल्या दिसणे याचा अर्थ असा होतो की आपल्याला फारच लवकर काही चांगली घटना कळणार आहेत आणि या घटना जितके फुलपाखरू उठावदार असेल तितक्या चांगला असतील. फुलपाखरू दिसल्यामुळे आपला जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धीची, भरभराटी होऊ लागते.
दुसरा जीव म्हणजे लक्ष्मी मातेचे वाहन आहे ते म्हणजे घुबड. असे म्हटले जाते की लक्ष्मी माता दिवाळीच्या कालावधीमध्ये घुबडा वर स्वार होऊन प्रत्येक घरांमध्ये येत असते. म्हणून ज्यांच्या घरातली सकाळी च्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस कोणीही झोपलेले नसते अशा वेळेस ती घरात प्रवेश करत असते. म्हणून जर आपल्याला कधी घुबड दिसले तर नक्कीच समजून जा की लक्ष्मी मातेचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि आपला घरामध्ये ती सदैव वास करणार आहे.
पुढील जीव म्हणजे गाई. आपण लहानपणापासून ऐकत आहे की गाय चया पोटामध्ये 33 कोटी देव वास करत असतात आणि जर ही गाय आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये सकाळी सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस दारात आली तर तिला हाक लावून देऊ नका. तिला योग्य तो खाऊ घाला म्हणजेच गुळ, डाळ, भाकरी, चपाती अशा प्रकारची खाऊ घाला. तिची पुजा करा. कारण गाय येण्याचा संकेत हाच आहे की ती आपल्या सोबत सुख समृद्धी घेऊन आलेले आहेत आणि आपल्या घरांमध्ये लवकरच कोणतीतरी चांगली बातमी मिळणार आहे व आपला घरात लक्ष्मीचा प्रवेश झालेला आहे. लक्ष्मी बरोबरच आपल्या घरांमध्ये अनेक प्रकारचे देवी देवता देखील आलेले आहेत
पुढील जीव आहे चिचुंद्री. शास्त्रानुसार चिचुंद्री आपल्या घरामध्ये प्रवेश करणे हे अशुभ मानले जाते. चिचुंद्री हे लक्ष्मी मातेचे प्रत्येक देखील मानले जाते. जर आपल्याला दिवाळीच्या या दिवसांमध्ये ती अवतीभवती आपल्या घराच्या परिसरामध्ये दिसत असेल तर आपला घरांमध्ये लक्ष्मी मातेचा प्रवेश झालेला आहे असे समजावे व लवकरच आपल्याला चांगली बातमी आपल्या कामावर येणार आहे. त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीच्या चारही भावतीचे हा जीव फेरी घालत असेल तर याचा अर्थ असा समजावा की त्या व्यक्तीच्या बाबतीत खूपच चांगली बातमी आपल्याला मिळणार आहे. त्याची उन्नती होणार आहे व त्यातला जीवनामध्ये भरपूर पैसे प्राप्त होणार आहेत.
पुढील जीव म्हणजे कावळा. खरं तर कावळा हा पीतरांचा प्रतीक मानला जातो. परंतु दिवाळीच्या या पावन दिवसांमध्ये जर तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर कावळा आढळून आला असेल तर नक्कीच हा तुमच्यासाठी खूपच शुभ संकेत मानले जातो. याचा अर्थ असा म्हटला जातो की जर तुमचे पित्र बंधनात असतील तर ते त्या बंधनातून मुक्त झालेल्या आहेत. दिवाळीच्या या दिवसांमध्ये प्रत्येक देवी देवता हे मुक्त असतात त्यामुळे त्यांना कोणताही प्रकारची वाईट शक्ती चा वापर करता येत नाही. असा वेळी सर्व काही शुभ होत असते.
पुढील जीव म्हणजे काळा मुंग्या. जर तुमच्या घरामध्ये सतत मुंग्या आढळून येत असतील तर याचा अर्थ खूपच चांगला मानला जातो. असे मानले जाते की तुमच्या घरांमध्ये येणाऱ्या जीवनात खूपच चांगला घटना घडवून येणार आहे. तुमच्या धन धान्यांमध्ये वाढ होणार आहे. जर तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यातून काळा मुलगा बाहेर पडलेल्या दिसत असतील तर नक्कीच हा खूपच शुभ संकेत मानला जातो. तुमच्या धनात खूपच वाढ होणार आहे. असा त्याचा अर्थ होतो.
पुढील जीव म्हणजे विंचू. कळ्या रंगाचा विंचू घरांमध्ये प्रवेश करणे हा खूपच वाईट संकेत मानला जातो. येणारा काळामध्ये जर तुम्हाला काळा विंचू दिसला तर पुढील काळात खूपच कठीण परिस्थितीमध्ये जाणार असल्याचा संकेत आहे. परंतु जर तुम्हाला पिवळ्या रंगाचा विंचू या दिवाळीच्या दिवसांमध्ये तुमच्या घरात आढळून आला तर हा खूपच शुभ संकेत मानला जातो. त्यामुळे आपल्या घरामध्ये चांगला घटना घडणार आहेत असे देखील मानले जाते .
पुढील जीव म्हणजे गोगलगाय. गोगलगाय जर तुमच्या घराच्या अवतीभवती दिसून येत असेल किंवा भिंतीवर चढताना दिसून येत असेल तरी याचा अर्थ असा समजला जातो की तुम्हाला येणाऱ्या जीवनामध्ये खूपच उन्नती प्राप्त होणार आहे. तुमच्या सर्व कठीण परिस्थिती दूर होणार आहेत आणि कामांमध्ये तुम्हाला भरभराटीचे यश प्रधान होणार आहे.
अशाप्रकारे हे काही जीव आहेत जर तुम्हाला हे दिवाळीच्या दिवसांमध्ये दिसत असतील तर नक्कीच तुमच्या घरांमध्ये खूपच चांगले संकेत येणार आहेत अशा त्याचा अर्थ होतो.